75 वर्षांनंतर असाही योगागोग, फाळणीत विभक्त झालेला शीख भाऊ करतारपूरमध्ये मुस्लिम बहिणीला भेटला

अमरजित सिंह म्हणाले की, जेव्हा त्यांना पहिल्यांदा कळले त्यांचे खरे पालक पाकिस्तानात आहेत आणि ते मुस्लिम आहेत, तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी स्वतःची समजूत काढली.

75 वर्षांनंतर असाही योगागोग, फाळणीत विभक्त झालेला शीख भाऊ करतारपूरमध्ये मुस्लिम बहिणीला भेटला
करतारपूर Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 2:34 PM

करतारपूर,  एखाद्या चित्रपटाला शोभून दिसेल अशी घटना पाकिस्तानच्या करतारपूर (Pakistan Kartarpur) येथील गुरुद्वारा दरबार साहिब येथे घडली आहे. भारतातील जालंधर येथे राहणारे अमरजित सिंह फाळणीच्या वेळी 1947 साली कुटुंबापासून विभक्त झाले होते. त्यानंतर ते  करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब येथे त्यांच्या पाकिस्तानी मुस्लिम बहिणीला (Muslim Sister) भेटले. हा क्षण दोघांसाठीही अकल्पित होताच शिवाय बहीण भावाच्या या भेटीने उपस्थितांचे डोळे देखील पाणावले होते. सिंह यांचे मुस्लिम पालक फाळणीच्या वेळी पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते तर ते आणि त्यांची बहीण भारतात मागे राहिले होते. बुधवारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुरुद्वारा दरबार साहिब येथे व्हीलचेअरवर बसलेले सिंह त्यांची मुस्लिम बहीण कुलसूम अख्तर यांना भेटले.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार सिंह आपल्या बहिणीला भेटण्यासाठी व्हिसा घेऊन वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात पोहोचले. 65 वर्षीय कुलसूमला तिचा भाऊ अमरजित सिंहला भावना अनावर झाल्या. बराच वेळ ते फक्त एकमेकांना मिठी मारून रडत होते.

भावाला भेटण्यासाठी फैसलाबादहून करतारपूरला आली बहीण

कुलसूम आणि मुलगा शहजाद अहमद आणि कुटुंबातील इतर सदस्य तिच्या भावाला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या  फैसलाबादहून करतारपूरला पोहोचले होते. वृत्तपत्राशी बोलताना कुलसूमने सांगितले की, त्यांचे आई-वडील 1947 मध्ये जालंधरच्या उपनगरातून पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते, तर त्यांचा भाऊ आणि एक बहीण तिथेच राहिले होते. कुलसूम म्हणाली की, तिचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. फाळणीच्या वेळी तिचा भाऊ आणि बहीण भारतात सुटल्याची गोष्ट त्या तिच्या आईकडून ऐकत असत.  आयुष्यात परत त्यांना तिच्या भाव बहिणीला भेटता येईल असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया कुलसुम यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

त्यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी सरदार दारा सिंह हे त्यांच्या वडिलांचे एक मित्र भारतातून पाकिस्तानात आले आणि त्यांनाही भेटले. त्यांनी सांगितले की, यावेळी त्यांच्या आईने सरदार दारा सिंह यांना भारतात सोडल्या गेलेल्या मुला आणि मुलीबद्दल सांगितले. त्यांनी आपल्या गावाचे नाव आणि इतर माहितीही दारा सिंगला दिली.

 व्हॉट्स ॲपवर साधला संपर्क

पाकिस्तानमध्ये कुलसुम यांना भेटल्यानंतर दारा सिंह यांनी त्यांच्या आईला सांगितले की त्यांचा मुलगा जिवंत आहे, परंतु त्यांची मुलगी मरण पावली आहे. कुलसूमच्या म्हणण्यानुसार, दारा सिंहने आपल्या आईला सांगितले की, त्यांच्या मुलाचे नाव अमरजित सिंग आहे, ज्याला 1947 मध्ये एका शीख कुटुंबाने दत्तक घेतले होते. आपल्या भावाची माहिती मिळाल्यानंतर कुलसूमन यांनी सिंह यांच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला आणि नंतर भेटण्याचा निर्णय घेतला.

माझ्यासाठी हा धक्का होता…  अमरजित सिंह

अमरजित सिंह म्हणाले की, जेव्हा त्यांना पहिल्यांदा कळले त्यांचे खरे पालक पाकिस्तानात आहेत आणि ते मुस्लिम आहेत, तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी स्वतःची समजूत काढली.  फाळणीच्या काळात स्वतःच्या स्वतःच्या कुटुंबियांपासून आहेकांची ताटातूट झाली होती. सिंग म्हणाले की, मला नेहमी आपल्या खऱ्या बहिणी आणि भावांना भेटायचे होते. आपले तीन भाऊ जिवंत असल्याचे कळताच आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जर्मनीत असलेल्या एका भावाचे निधन झाले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.