बांगलादेशानंतर थायलंडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, सुप्रीम कोर्टाने पंतप्रधानांना खड्यासारखं दूर केले, ही चूक आली अंगलट

Thailand PM Removes : पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, नुकताच बांगलादेशात राजकीय भूकंप येऊन गेला. आता थायलंडमध्ये पण मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. तिथल्या घटनात्मक कोर्टाने पंतप्रधानाची थेट हकालपट्टी केली आहे. काय आहे प्रकरण?

बांगलादेशानंतर थायलंडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, सुप्रीम कोर्टाने पंतप्रधानांना खड्यासारखं दूर केले, ही चूक आली अंगलट
पतंप्रधानांची केली हकालपट्टी
Follow us
| Updated on: Aug 14, 2024 | 5:24 PM

बांगलादेश पाठोपाठ आशियातील आणखी एका देशात मोठी राजकीय उलथापालथ झाली. थायलंडमध्ये राजकीय भूकंप आला. अर्थात येथे कोणतेही आंदोलन झाले नाही. जनता रस्त्यावर उतरली नाही. तर कायद्याच्या मार्गाने सर्वोच्च व्यक्तीला झटका बसला. पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांची घटनापीठाने थेट हकालपट्टी केली. काय आहे हे प्रकरण, कोणती चूक भोवली थाविसिन यांना?

बहुमताने हकालपट्टीचा निर्णय

एक आठवड्यापूर्वीच थायलंडच्या न्यायालयाने विरोधी पक्ष बरखास्त केला होता. त्यामुळे पंतप्रधानासह मंत्रिमंडळ पण घाबरलेले होते. त्यातच न्यायाधीशांनी 5-4 अशा बहुमताने श्रेथा थाविसिन यांची हकालपट्टी केली. घटनात्मक न्यायालयाने श्रेथा यांना मंत्रिमंडळात नुकत्याच समावेश करण्यात आलेल्या सदस्यावरुन पंतप्रधानांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला.

हे सुद्धा वाचा

ही चूक भोवली

श्रेथा थाविसिन यांनी मंत्रिमंडळात एका वकिलाला नियुक्ती दिली. त्याच्यावर गुन्हेगारीचे आरोप होते. घटनात्मक न्यायालयाने श्रेथा यांना या मंत्रिमंडळातील नवीन सदस्य नियुक्तीत नियमांचं उल्लंघन केल्याने दोषी ठरवलं. हे प्रकरण थायलंडमध्ये यापूर्वी सत्तेत आलेल्या जून्टाकडून नियुक्त माजी सिनेटर्सच्या गटाने उचलून धरले होते.

आता पुढे काय

पिचिट चुएनबान यांची श्रेथा थाविसिन यांनी नियुक्ती केली होती. त्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदल केला होता. त्याविरोधात आवाज उठवण्यात आला होता. नऊ सदस्यीय घटनापीठाने याविषयीचा निकाल दिला. थाविसिन यांना पदावरुन हाकलण्यात आले. आता संसद नवीन पंतप्रधानांची नियुक्ती करत नाही, तोपर्यंत सध्याचे मंत्रिमंडळ हंगामी म्हणून कारभार पाहिल. पंतप्रधान नियुक्त करण्याविषयी घटनापीठाने कोणतीही मुदत दिलेली नाही.

पिचिट यांना 2008 मध्ये न्यायालयाच्या अवमान प्रकरणात 6 महिन्यांचा तुरुंगवास झाला होता. त्यांनी त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांच्या एका प्रकरणात थेट न्यायाधीशांनाच लाच देण्याचा प्रयत्न केला होता. 2 दशलक्ष थाई बॉट चलन देण्याचे आमिष पिचिट यांनी दाखवले होते. त्यानंतर आता त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर मोठा वाद उफाळला. हे प्रकरण न्यायालयात गेले. पिचिट यांनी काही दिवसांपूर्वीच पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता पंतप्रधानांवर मोठी कारवाई झाली. विरोधी पक्षाला पण यापूर्वीच दणका बसला आहे.

तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.