Lockdown | ब्रिटननंतर जर्मनीतही लॉकडाऊन, पाहा कोणकोणत्या देशांमध्ये घोषणा

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसनने (PM Boris Johnson) वेगाने परसणाऱ्या या विषाणुला रोखण्यासाठी लॉकडाउनची घोषणा केली आहे.

Lockdown | ब्रिटननंतर जर्मनीतही लॉकडाऊन, पाहा कोणकोणत्या देशांमध्ये घोषणा
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 11:18 AM

लंडन : ब्रिटनमध्ये (Britain) आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने 2021 (New Strain of Coronavirus) मध्येही लॉकडाऊनसारखी (Lockdown)परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसनने (PM Boris Johnson) वेगाने परसणाऱ्या या विषाणुला रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यासोबतच आता इतर देशांनीही लॉकडाऊनची घोषणा केली आहे (New Strain of Coronavirus).

जर्मनीच्या चान्सलर एंजला मार्केल ( Angela Merkel) यांनीही देशात लॉकडाऊनची घोषणा केली. “जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत देशात लॉकडाऊन असेल. कोरोना विषाणुच्या नव्या स्ट्रेनवर प्रतिबंध लावण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात येत आहेत”, असं त्या म्हणाल्या.

30 डिसेंबर, 2020 ला पहिल्यांदा जर्मनीत एका दिवशी एक हजारापेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. बुधवारी येथे 1,129 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. जर्मनीमध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत शाळा, ऑफीस इत्यादी सर्व बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या देशांकडून लॉकडाऊनची घोषणा

स्कॉटलंड

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या घोषणेनंतर इंग्लंडसह स्कॉटलंडमध्येही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

नेदरलँड्स

नेदरलँड्सने कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका बघता डिसेंबरमध्येच लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. येथे 19 जानेवारीपर्यंत सर्व शाळा, अत्यावश्यक सामानांची दुकानं वगळता इतर सर्व दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रिया

ऑस्ट्रियाने त्या घोषणेला परत घेतलं आहे, ज्याअंतर्गत कोरोना निगेटीव्ह रिपोर्टसोबत बाहेर निघू शकता. येथे 24 जानेवारीपर्यंत सर्व शाळा, अत्यावश्यक सामानांची दुकानं वगळता इतर सर्व दुकानं बंद ठेवण्यात येणार आहे.

पोलंड

पोलंडने 28 डिसेंबरपासून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. याअंतर्गत शॉपिंग सेंटर बंद राहातील आणि फिरण्यावरही निर्बंध असतील (New Strain of Coronavirus).

कोलंबिया

कोलंबियाने आपली राजधानी राजधानी बागोतामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे कोलंबियाच्या शहरांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

झिंबाब्वे

झिंबाब्वेमध्येही कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अर्थव्यवस्था ढासळत असल्याने झिंबाब्वेची परिस्थिती वाईट आहे. अशा परिस्थितीत कोरोनापासून वाचण्यासाठी दुसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

New Strain of Coronavirus

संबंधित बातम्या :

ब्रिटनहून आलेल्या 58 प्रवाशांना नवा कोरोना, महाराष्ट्रातील 8 जणांना संसर्ग

रविवार विशेष : कोरोनाची नियमावली काय? राज्यात अद्यापही नेमकं काय सुरु, काय बंद?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.