Boycott Maldives | मालदीव सरकारने आपले तीन मंत्री मरियम शिउना, मालशा शरीफ आणि महज़ूम माजिद यांच्याविरोधात मोठी Action घेतली आहे. या तीन मंत्र्यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपमानास्पद टिप्पणी केली होती. हा मुद्दा भारत सरकारने मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारसमोर उपस्थित केला. मालेमध्ये भारताच्या भारतीय उच्चायुक्तांनी या मंत्र्यांच्या टिप्पणीवर कठोर शब्दात आक्षेप नोंदवला. त्यानंतर मोहम्मद मुइज्जू सरकार बॅकफूटवर गेलं. मालदीव सरकारने आपल्या मंत्र्यांची टिप्पणी पटलेली नाही, हे दाखवून देण्याससाठी तिघांना निलंबित केलं. मोहम्मद मुइज्जू सरकारला हा विषय वाढवायचा नाहीय, कारण त्यात त्यांचच नुकसान आहे, म्हणून त्यांनी झटपट निलंबनाची कारवाई केलीय.
मालदीवची अर्थव्यवस्था पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. पर्यटन हे परदेशी चलन आणि सरकारी महसूलाचा मोठा स्त्रोत आहे. मालदीवची जीडीपी पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मालदीवच्या नागरिकांसाठी पर्यटन एक मोठा आधार आहे. मालदीवच्या रोजगारात पर्यटनाच योगदान 70 टक्क्याच्या आसपास आहे. भारतातून मोठ्या संख्येने पर्यटक मालदीवला जातात. 2018 मध्ये 14,84,274 पर्यटक मालदीवला गेले. त्यातले 6.1% (90,474 पेक्षा अधिक) टूरिस्ट भारतातून गेले होते. 2019 मध्ये भारतातून मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दुप्पट झाली. 2019 मध्ये 1,66,030 पर्यटक मालदीवला गेले होते. मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर होता.
भारतातून मालदीवला काय निर्यात होते?
2021 मध्ये भारत मालदीवचा तिसरा मोठा व्यापारी भागीदार ठरला. मालदीवमधून भारत स्क्रॅप धातूची आयात करतो. भारतातून मालदीवला विभिन्न प्रकारचे इंजिनिअरींग आणि औद्योगिक उत्पादन उदहारणार्थ फार्मास्यूटिकल्स, रडार उपकरण, रॉक बोल्डर, सीमेंटची निर्यात करतो. कृषी उत्पादनांमध्ये तांदूळ, मसाले, फळ आणि पोल्ट्री उत्पादनही आहेत.
EaseMyTrip चा मालदीव विरोधात मोठा निर्णय
मालदीव बहिष्कार अभियानादरम्यान EaseMyTrip ने एक मोठ पाऊल उचललय. त्यांनी मालदीवला जाणारे सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केल्या आहे. EaseMyTrip एका ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपला गेले होते. त्यानंतर मालदीवच्या काही मंत्र्यांनी अपमानजनक टिप्पणी केली. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर EaseMyTrip ने हा निर्णय घेतला आहे.