गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांचा जीव घेणारी हिंसक झटापट चीनच्या ‘षडयंत्रा’चा भाग, US काँग्रेस पॅनलचा दावा

अमेरिकेच्या (US) उच्चस्तरीय काँग्रेस पॅनलने म्हटलं आहे, "जूनमधील गलवान खोऱ्यातील हिंसक झटापट चिनी सरकारच्या (China Governmnet) षडयंत्राचा भाग आहे.

गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांचा जीव घेणारी हिंसक झटापट चीनच्या 'षडयंत्रा'चा भाग, US काँग्रेस पॅनलचा दावा
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 4:27 PM

वॉशिंग्टन : भारत आणि चीनच्या सीमेवर मागील अनेक दिवसांपासून तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशाचं सैन्य वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) एकमेकांच्या विरोधात उभं आहे. चीनच्या सैन्याने जून 2020 मध्ये लडाखच्या (Ladakh) पूर्व भागातील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. या घटनेवर अमेरिकेच्या (US) उच्चस्तरीय काँग्रेस पॅनलने म्हटलं आहे, “जूनमधील गलवान खोऱ्यातील हिंसक झटापट चिनी सरकारच्या (China Governmnet) षडयंत्राचा भाग आहे. चीनने आपल्या शेजारी देशांविरोधात एक घातक अभियान सुरु केलं होतं (Aggressive and violent incident in Galwan Vally on India China LAC was planned by China claim by US congress panel).

नुकताच अमेरिकेच्या काँग्रेस पॅनले यूनायटेड स्टेट-चायना इकोनॉमी अँड सिक्युरिटी रिव्ह्यू कमिशनचा (USCC) वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. यात गलवान खोऱ्यातील भारत-चीनमधील झटापट आणि चीनचं झडयंत्र याबाबत दावा करण्यात आला आहे. अहवालामध्ये मिळालेले काही पुरावे गलवान खोऱ्यातील हिंस्र झटापट हा नियोजित कट असल्याकडे दिशानिर्देश करत आहेत, असं म्हटलं आहे.

यूएससीसीची स्थापना 2000 मध्ये झाली होती. ही संस्था अमेरिका आणि चीनमधील राष्ट्रीय सुरक्षा आणि व्यापारविषयक मुद्द्यांचा तपास करते. या शिवाय ही संस्था अमेरिकेच्या काँग्रेसला प्रशासकीय निर्णय घेण्याच्या अनुषंगाने पूरक माहिती म्हणून यावर एक अहवाल देखील साजरा करते.

अमेरिकेच्या या अहवालात म्हटलं आहे, “आपल्या शेजारी राष्ट्रांशी सोडून असलेल्या वास्तविक सीमा रेषेवर (एलएसी) चीनकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. त्याच्या कारणांचा तपास केला जात आहे. चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंघे यांनी या तणावपूर्ण घटना होण्याआधी आपल्या एका वक्तव्यात म्हटलं होतं की चीनमध्ये स्थिरता ठेवण्यासाठी युद्धाला प्रोत्साहन द्यावं लागले.

याशिवाय चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्समधील एक संपादकीयमध्ये म्हटलं होतं, की जर भारत अमेरिका आणि चीनच्या मध्ये हस्तक्षेप करत असेल तर त्यांना चीनसोबतच्या व्यापारात आणि आर्थिक संबंधांमध्ये नुकसान सहन करावं लागेल.”

संबंधित बातम्या :

भारताविरोधात चीनची नवी चाल, ब्रह्मपुत्रा नदीवर ड्रॅगन उभारणार ‘सुपर डॅम’

लडाखमध्ये मायनस 40 डिग्रीतही चीनला आव्हान देणार, थंडीसाठी भारतीय सैन्याची चोख व्यवस्था

चीनला धडकी, भारताला लवकरच S-400 क्षेपणास्त्र प्रणाली मिळणार, रशियाचं आश्वासन

Aggressive and violent incident in Galwan Vally on India China LAC was planned by China claim by US congress panel

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.