एअर होस्टेसला अंतर्वस्त्र घालणे अनिवार्य, पाकिस्तान एअर लाईनचा तुगलकी फर्मान
जगाच्या पाठीवर पाकिस्तान असा देश आहे जो कायमच त्याच्या निर्णयांमुळे स्वतःचा बावळटपणा सिद्ध करत असतो.
मुंबई, पाकिस्तानचा बावळटपणा कायमच जगात चर्चेचा विषय असतो. यावेळी पाकिस्तानी एअरलाइन्सने (Pakistan Airline) असा तुघलकी फर्मान जारी केला आहे, ज्यामुळे जगभरात त्याची खिल्ली उडविली जात आहे. पाकिस्तानची राष्ट्रीय एअरलाइन, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) ने एअर होस्टेससह सर्व क्रू मेंबर्सना अनिवार्यपणे अंतर्वस्त्र (Undergarment Rule) घालण्यास सांगितले आहे.
पाकिस्तानी चॅनल जिओ टीव्हीनुसार, राष्ट्रीय विमान कंपनी PIA ने आपल्या क्रू मेंबर्सना अंडरगारमेंट परिधान करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. एअर होस्टेस आणि क्रू मेंबर्सच्या ड्रेसिंग न केल्यामुळे पीआयएची प्रतिमा मलीन होत असल्याचा दावा पीआयएने केला आहे. एअरलाइन्सच्या आदेशात असे म्हटले आहे की, जर साधे कपडे असतील तर एअर होस्टेसने अंतर्वस्त्र परिधान करणे अनिवार्य आहे.
का काढला असा नियम?
पीआयए एअरलाइन्सचे महाव्यवस्थापक अमीर बशीर यांनी जारी केलेल्या आदेशात असे निदर्शनास आले आहे की, पीआयएच्या एअर होस्टेस इतर शहरांमध्ये प्रवास करतात किंवा हॉटेलमध्ये राहतात तसेच वेगवेगळ्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांनी योग्य कपडे घालत नसल्याचे समोर आले आहे. अंतर्वस्त्र परिधान न केल्यामुळे केवळ वैयक्तिक प्रतिमाच नाही तर विमान कंपन्यांची प्रतिमाही डागाळत असल्याने ते म्हणाले.
अंतर्वस्त्र न घातल्यास होणार कारवाई
अमीर बशीरने केबिन क्रूला स्पष्टपणे सांगितले की, जर साधे कपडे असतील तर एअर होस्टेसने अंतर्वस्त्र घालणे आवश्यक आहे. विमान कंपनीने जारी केलेल्या तुघलकी फर्मानामध्ये असे म्हटले आहे की, पुरुष आणि स्त्रियांनी परिधान केलेले कपडे आपल्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय नीतिनियमांनुसार असले पाहिजेत. या संदर्भात अधिकाऱ्यांना केबिन क्रूवर सदैव नजर ठेवण्याचे आणि नियमांचे पालन होत नसल्यास अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई देखील होणार आहे.