Pokhra Plane Crash: नेपाळचे दुसरे मोठे शहर पोखरा कसे आहे? जिथे घडली विमान दुर्घटना
पोखरा हे काठमांडूनंतर नेपाळमधील दुसरे मोठे शहर आहे. जगभरातून पर्यटक येथे येतात आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात.
पोखरा, पोखरा हे काठमांडूनंतर नेपाळमधील दुसरे मोठे शहर आहे. जगभरातून पर्यटक येथे येतात आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात. हे शहर देखील डोंगरांच्यामधे वसलेले आहे. पोखरा हे गंडकी विभागातील कास्की जिल्ह्यात येते. पोखरा व्हॅलीही इथेच आहे. नेपाळमधील पोखरा शहराची आज जगभरात चर्चा होत आहे. त्याचे कारण म्हणजे भीषण विमान अपघात (Pokhra Plane Crash). नेपाळमध्ये रविवारी वर्षातील पहिला मोठा विमान अपघात झाला. क्रू मेंबर्ससह 72 प्रवाशांना घेऊन काठमांडूहून पोखराकडे येणाऱ्या विमानाला शहरात प्रवेश करण्यापूर्वी काही अंतराआधी अपघात झाला.
नेपाळमधील दुसरे मोठे शहर
पोखरा हे काठमांडूनंतर नेपाळमधील दुसरे मोठे शहर आहे. जगभरातून पर्यटक येथे येतात आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात. येथे अन्नपूर्णा परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक ट्रेकिंगसाठी जातात. त्यांच्यासाठी पोखरा हे सुरुवातीचे ठिकाण आहे. शहरातील तलावाकाठी असलेला भाग पर्यटकांची पहिली पसंती आहे. हा एक अतिशय शांत परिसर आहे. शांतता अनुभवण्यासाठी लोकं येथे येतात.
कशी घडली विमान दुर्घटना?
नेपाळमध्ये आज एक मोठा विमान अपघात झाला. नेपाळमधील पोखरा येथे एक प्रवासी विमान कोसळले, ज्यामध्ये तीन मुलांसह 68 प्रवासी होते. या विमानात दोन भारतीय नागरिकांसह 11 परदेशी प्रवासी होते. नेपाळ आर्मी, सशस्त्र पोलीस, नेपाळ पोलीस तसेच स्थानिक नागरिक बचाव कार्यात गुंतले आहेत. बचाव मोहिमेदरम्यान आतापर्यंत 36 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान प्रचंड यांनी सर्व सरकारी यंत्रणांना प्रभावी बचाव कार्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेबाबत त्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठकही बोलावली आहे. पंतप्रधान प्रचंड यांची तातडीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला नेपाळच्या प्रचंड सरकारचे कॅबिनेट मंत्री उपस्थित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यति एअरलाइन्सच्या ATR-72 विमानाने काठमांडूहून पोखरा येथे उड्डाण केले होते. या 72 सीटर विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते, म्हणजे एकूण 72 लोक होते. विमान पोखराजवळ पोहोचले होते तेव्हा ते कोसळले. नेपाळी मीडियानुसार, पोखराचे जुने देशांतर्गत विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हा अपघात झाला.