बायडन आता फक्त एक पाऊल दूर !
अमेरिकेच्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी इलेक्टोरल कॉलेज मतदान करणार आहेत. (America electrical college meeting)
वॅशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षांची अधिकृतपणे निवड करण्यासाठी इलेक्टोरल कॉलेज (Electoral College) सोमवारी (14 डिसेंबर) मतदान करणार आहेत. त्यामुळे बायडेन हेच पुढचे राष्ट्राध्यक्ष असले तरी, इकेल्टोरल कॉलेजेसच्या मतदान प्रक्रियेमुळे बायडेन राष्ट्राध्यक्षपदाच्या फक्त एक पाऊल दूर आहेत. (America electrical college meeting will decide the next president)
अमेरिकेत आपल्या राष्ट्राध्यक्षाची निवड थेट पद्धतीने केली जात नाही. जनतेने निवडून दिलेले इलेक्टोरल कॉलेज राष्ट्राध्यक्षाची निवड करतात. त्यासाठी देशातील सर्व 50 राज्यांमधील इलेक्टोरल कॉलेज यांची सोमवारी (14 डिसेंबर) बैठक होणार आहे. या बैठकीत अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड केली जाईल.
इलेक्टोरल कॉलेजेसच्या मतांची मोजणी कशी होईल?
सर्व इलेक्टोरल कॉलेज यांनी मतदान केल्यानंतर मतपत्रिका वॉशिंग्टन येथे पाठवण्यात येतील. 6 जानेवारी रोजी अमेरिकन संसदेच्या संयुक्त सत्रात इकेक्टोरल कॉलेज यांनी केलेल्या मतांची मोजणी होईल. या संसदेच्या संयुक्त सत्राच्या अध्यक्षस्थानी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स हे असतील. त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही मतमोजणी होईल.
इलेक्टोरल कोलेजला यावेळी विशेष महत्त्व
अमेरिकेत आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये इलेक्टोरल कॉलेजेसची चर्चा जास्त नव्हती. मात्र, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा पराभव मान्य न केल्यामुळे इलेक्टोरल कॉलेजेसच्या मतांनाही चांगलंच महत्त्व आलं आहे. कधीकधी इलेक्टोरल कॉलेज आपल्या पक्षाच्या विरोधात जाऊ शकतात. ऐन मतदानावेळी ते पक्षाच्या उमेदावाराविरोधात मत देऊ शकतात. अशा वेळी राष्ट्राध्यक्षाची निवड किचकट होऊ शकते. आपल्या पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध मत देणाऱ्या इलेक्टोरल कॉलेजलेसला फेथलेस इलेक्टोरल्स (faithless electors) म्हणतात. त्यांच्या बंडामुळे बहुमतात असूनही उमेदवाराचा ऐनवेळी पराभव होऊ शकतो. याच कारणामुळे इलेक्टोरल कॉलेज यांच्या बैठकील महत्त्व प्राप्त झाले आहे. (America electrical college meeting will decide the next president)
डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव अमान्य
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना बहुमताचाही आकडा पार करता आलेला नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदावरुन पायउतार होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, ट्रम्प यांनी त्यांचा पराभव अमान्य करत विरोधकांनी चुकीच्या पद्दतीने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला आहे. त्यांनी त्यासाठी कोर्टातही धाव घेतली होती. मात्र, अमेरिकन कोर्टाने त्यांचे सर्व आरोप तत्थ्यहीन असल्याचे सांगत ते फेटाळून लावले.(America electrical college meeting will decide the next president)
जो बायडेन यांना 306 इलेक्टोरल मतं
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी एकूण 306 इलेक्टोरल मतं मिळवलेली आहेत. तर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 232 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसायचे असेल, तर 270 हा बाहुमताचा जादुई आकडा पार करण्याची कसरत करावी लागते. हाती आलेल्या निकालानुसार जो बायडेन यांनी हा आकडा सहाजसहजी पार केलेला आहे. मात्र, सोमवारच्या (14 डिसेंबर) इलेक्टोरल कॉलेज यांच्या बैठकीत मतदान झाल्यानंतरच अमेरिकन अध्यक्षाच्या नावावर शिक्कमोर्तब होईल.
राम मंदिराचं भूमिपूजन झालं, पण अयोध्येतील मशिद कशी असेल? https://t.co/xDlJlOP2gx @PMOIndia @narendramodi @AmitShah #AyodhyaRamMandir #ayodhyamosque
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 14, 2020
संबंधित बातम्या :
अमेरिकेत आजपासून नागरिकांना मिळणार फायझर लस, पहिल्या फेरीत 30 लाख डोस
कोरोना लसीचे अनेक दुष्परिणाम, पॅरालिसीससारख्या गंभीर आजारांचा धोका
(America electrical college meeting will decide the next president)