Video : विमानाच्या पायऱ्यांवरुन चढताना 3 वेळा पाय सटकला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा तोल गेला
विमानाच्या पायऱ्या चढताना एकूण तीन वेळा जो बायडन यांचा तोल गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. America president joe biden Stumbles Thrice
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (America president joe biden) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये विमानात प्रवेश करतावेळी पायऱ्यांवर त्यांचा तोल गेल्याचं दिसत आहे. विमानाच्या पायऱ्या चढताना एकूण तीन वेळा त्यांचा तोल गेल्याचं व्हिडीओमधून दिसत आहे. त्यांचा तोल जरी गेला असला तरी त्यांनी स्वत:ला प्रत्येक वेळा सांभाळलं. सुदैवाची गोष्ट म्हणजे पायऱ्यांवर पाय जरी घसरला तरी त्यांना यामध्ये कोणतीही दुर्घटना झालेली नाही. (America president joe biden Stumbles Thrice While boarding Air Force)
घटना काय?
राष्ट्रपती जो बायडन शुक्रवारी अटलांटा दौऱ्यावर जात होते. जिथे त्यांना आशियाई-अमेरिकी समुदायाच्या नेत्यांसोबत अनेक महत्त्वांच्या विषयांवर चर्चा करायची होती. अटलांटा जाण्यासाठी ते एअरफोर्स वन विमानाच्या पायऱ्यांवरुन वरती विमानात जात होते. मात्र त्यांचं संतुलन ढळलं आणि त्यांचा दोन ते तीन वेळा तोल गेला.
व्हिडीओमध्ये काय?
व्हिडीओमध्ये असं दिसून येतंय, तोल गेल्यानंतर ते दोन वेळा हाताच्या साहाय्याने पुन्हा उठले. परंतु तिसऱ्या वेळी त्यांचा जरा जास्तच तोल गेला. मग त्यांनी विमानाच्या साइड रेलिंगला पकडलं आणि गेलेला तोल सावरला.
WATCH: Biden falls three times trying to climb the stairs to board Air Force One pic.twitter.com/IfDUjLPQB4
— Breaking911 (@Breaking911) March 19, 2021
व्हाईट व्हाऊसने काय स्पष्टीकरण दिलंय?
अखेर सगळ्या पायऱ्या चढल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना नमस्कार करुन ते विमानात बसले. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी कैरिन जीन पियरे यांनी माध्यमांना सांगितलं की 100 टक्के तंदुरुस्त आहेत. कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही. पायऱ्यांवर चुकीची पावले पडल्याशिवाय याच्यात काहीही नव्हतं, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रपती विमानात प्रवेश करतेवेळी हवा जास्त जोरात सुरु होती. याचमुळे 78 वर्षीय जो बायडेन यांची पावलं पायऱ्यांवर चुकीच्या ठिकाणी पडली आणि त्यांचा तोल गेला.
(America president joe biden Stumbles Thrice While boarding Air Force)
हे ही वाचा :
सेक्स, ईश्वर आणि बंदूका, अमेरिकेतल्या त्या हत्याकांडाचं कोडं उलगडलं? वाचा काय म्हणतो हत्यारा?