‘या मुर्खांना कुणी कामावर ठेवलं’, भारतीय कलाकारांच्या ट्विट मालिकेवर हॉलिवूड बरसलं

अमेरिकेची अभिनेत्री अमांडा सर्नीने (Amanda Cerny) शेतकरी आंदोलनावरुन बॉलिवूड कलाकारांना चांगलाच लक्ष्य केलंय.

'या मुर्खांना कुणी कामावर ठेवलं', भारतीय कलाकारांच्या ट्विट मालिकेवर हॉलिवूड बरसलं
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 1:03 AM

नवी दिल्ली : अमेरिकेची अभिनेत्री अमांडा सर्नीने (Amanda Cerny) शेतकरी आंदोलनावरुन बॉलिवूड कलाकारांना चांगलाच लक्ष्य केलंय. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यावरुन अमांडालाही ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय. मात्र, तिने ट्रोल्सला सडेतोड उत्तर देत बॉलिवूड कलाकारांना फटकारलं आहे. भारतात अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगन, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि करण जोहरने ट्विट करत शेतकरी आंदोलनाला दिलेल्या आंतरराष्ट्रीय पाठिंब्याला षडयंत्र म्हटलंय. तसेच याबाबत चुकीचा प्रचार होत असल्याचा आरोप केला. यावर अमांडा सर्नीने (Amanda Cerny) पुन्हा एकदा ट्विट करत त्यांना झोडपलंय (American Actress Amanda Cerny says idiots to Bollywood celebraties who tweeted against international celebrities).

अमांडा सर्नीने (Amanda Cerny) म्हटलं, “ज्यांनी प्रचाराची मोहिम (प्रोपोगेंडा) तयार केलीय त्या मुर्खांना कामावर कुणी घेतलंय? एक असंबंध व्यक्ती भारताला वेगळं करण्याचं षडयंत्र करत आहे आणि तिला त्यासाठी पैसे मिळत आहेत? थोडा तरी विचार करा. कमीत कमी याला तरी थोडफार वास्तववादी ठेवा.’

अमेरिकेची प्रसिद्ध पॉप सिंगर रिहाना, जागतिक पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थर्नबर्ग आणि मिया खलिफा यांच्या प्रमाणेच अमांडा सर्नीने (Amanda Cerny) इंस्टाग्रामवर आपली बाजू मांडलीय. अमांडा सर्नीने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलंय, “जग पाहात आहे. तुम्हाला शेतकऱ्यांचा मुद्दा समजून घेण्यासाठी भारतीय किंवा पंजाबी किंवा दक्षिण आशियाई होणं आवश्यक नाहीये. तुम्ही केवळ माणूसकीचे कैवारी असले पाहिजे. कायम अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माध्यमांचं स्वातंत्र्य, कामगारांसाठी समानतेची आणि सन्मानाची मागणी केली पाहिजे.”

हेही वाचा :

‘आंदोलक शेतकऱ्यांच्या मुलभूत सुविधाही केंद्रानं रोखल्या,’ विरोधी पक्षाच्या खासदारांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

सकाळी पॉपस्टार, आता पॉर्नस्टार, मिया खलिफा शेतकऱ्यांसाठी मैदानात, कोण आहे मिया?

बळीराजासाठी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींची भाची मैदानात; मोदी सरकारवर केली टीका

व्हिडीओ पाहा :

American Actress Amanda Cerny says idiots to Bollywood celebraties who tweeted against international celebrities

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.