Superfetation | गर्भात जुळी मुलं, प्रसुतीआधीच महिला पुन्हा प्रेग्नंट

जुळ्या मुलांच्या गर्भधारणेनंतर एका आठवड्यात त्यांना कळाले की त्या तिसऱ्या बाळालाही कंसिव्ह करणार आहेत.

Superfetation | गर्भात जुळी मुलं, प्रसुतीआधीच महिला पुन्हा प्रेग्नंट
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 3:36 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेत एका महिलेसोबत दुर्मिळ घटना घडली आहे (American Woman Conceive Again After Getting Pregnant). जुळ्या मुलांच्या गर्भधारणेनंतर एका आठवड्यात त्यांना कळाले की त्या तिसऱ्या बाळालाही कंसिव्ह करणार आहेत. ही महिला टिकटॉकवर (Tik-Tok) अत्यंत लोकप्रिय आहे. या महिलेने स्वत: सोशल मीडियावर लोकांना माहिती दिली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे (American Woman Conceive Again After Getting Pregnant).

या महिलेने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितलं की, हे सुपर फिटीशनचं (Superfetation) प्रकरण आहे. वर्ष 2016 च्या एका रिपोर्टनुसार, सुपर फिटीशनच्या खूप कमी केसेस येतात. याअंतर्गत ही महिला काहीच दिवसांच्या कालावधीत दुसऱ्यांदा प्रेग्नंन्ट झाली. “मी माझ्या महिल्या प्रेग्नंन्सीवर जॅकपॉट मिळवला आहे. मला एकत्र तीन मुलं होणार आहेत. त्यामुळे ही माझी पहिली आणि शेवटची प्रेग्नंन्सी असण्याची शक्यता आहे”, असं तिने सांगितलं.

टिकटॉकवरील व्हायरल व्हिडीओमध्ये या महिलेने सांगितलं की, “माझं तिसरं मुल पहिल्या दोन मुलांपेक्षा फक्त 10 ते 11 दिवसांनी लहान आहे. यामुळे हे स्पष्ट झालं आहे की, ही माझी दुसरी प्रेग्नंन्सी असेल. हे बाळ कुपोषित नाही हे सुपर फिटीशन आहे. हे तपासण्यासाठी डॉक्टर्स दर दोन महिन्यांनी माझं अल्ट्रास्कॅन करणार आहेत”.

“हे बाळ हेल्दी रेटवर ग्रो करत आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे”, असंही तिने या व्हिडीओत सांगितलं. तिच्या या व्हिडीओला टिकटॉकवर आतापर्यंत 50 लाखांहून जास्त लोकांनी पाहिलं आहे. टिकटॉकवर ब्लॉन्ड बनी नावाच्या युझरनेमने व्हिडीओ पोस्ट करणारी ही महिला वेळोवेळी तिच्या फॅन्सना तिच्या प्रेग्नंन्सीबाबत अपडेट देत असते.

तिसऱ्या बाळाच्या सरप्राईजनंतर ही टिकटॉक स्टार आई होण्यासाठी आणखी उत्साहित आहेत. “आम्हाला पालक व्हायचं होतं आणि आम्ही नशिबवान आहोत की एकत्र तीन मुलं आमच्या आयुष्यात येणार आहे. मी थोडी नर्व्हस आहे पण उत्साहितही आहे. माझ्या मनात सध्या खूप मिश्रित भावना आहेत”, असंही तिने सांगितलं.

American Woman Conceive Again After Getting Pregnant

संबंधित बातम्या :

‘गर्भवतीचं पोट फाडून बाळाचं अपहरण’, अमेरिकेत 67 वर्षांनी पहिल्यांदाच महिलेला मृत्युदंडाची शिक्षा

ग्रहण काळात गर्भवती महिलेने भाजी चिरणे, फळे कापणे, झाडांची फळं पानं तोडणं, पाणी पिणे अशी कामं करावी का?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.