मसूद अजहरवर बंदी घालण्यासाठी अमेरिकेची नवी रणनीती

न्यू यॉर्क : अमेरिकेने बुधवारी पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद संघटनेचा म्होरक्या अजहर मसूदवर बंदी घालण्यासाठी थेट संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे प्रस्ताव पाठवला आहे. मसूदवर बंदी घालण्याच्या मागणीला चीनने संयुक्त राष्ट्राच्या समितीमध्ये विरोध केला होता. त्यामुळे अमेरिकेने थेट सुरक्षा परिषदेत जाण्याचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेच्या या कृतीने संयुक्त राष्ट्रात चीन आणि अमेरिकेत संघर्ष पाहायला मिळणार आहे. […]

मसूद अजहरवर बंदी घालण्यासाठी अमेरिकेची नवी रणनीती
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

न्यू यॉर्क : अमेरिकेने बुधवारी पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद संघटनेचा म्होरक्या अजहर मसूदवर बंदी घालण्यासाठी थेट संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे प्रस्ताव पाठवला आहे. मसूदवर बंदी घालण्याच्या मागणीला चीनने संयुक्त राष्ट्राच्या समितीमध्ये विरोध केला होता. त्यामुळे अमेरिकेने थेट सुरक्षा परिषदेत जाण्याचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेच्या या कृतीने संयुक्त राष्ट्रात चीन आणि अमेरिकेत संघर्ष पाहायला मिळणार आहे. चीनने अजहरवर बंदी घालण्याच्या मागणीला विरोध केल्याने भारत आणि चीन यांच्या संबंधातही तणाव पाहायला मिळाला होता.

काश्मीरमध्ये 14 फ्रेब्रुवारीला जैशच्या एका आत्मघातकी हल्ल्यात भारतीय सेनेचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. अजहरवर बंदी आणावी यासाठीच्या मसुद्यात या हल्ल्याचाही उल्लेख करत निषेध करण्यात आला आहे. तसेच अजहरला अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट यांचा समावेश असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या काळ्या यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. असे असले तरी हे अजूनही स्पष्ट नाही की या प्रस्तावावर मतदान कधी होणार? यावरही चीन व्हिटोचा वापर करु शकतो. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत 5 सदस्य देश आहेत. यात ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिकेसह चीनचाही समावेश आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ म्हणाले, चीन आपल्या येथे लाखों मुस्लिमांचे शोषण करत आहे. मात्र, दुसरीकडे हिंसक दहशतवादी संघटनांना संयुक्त राष्ट्राच्या बंदीपासून वाचवतो. याद्वारे पोम्पिओ यांनी चीनच्या अजहरवर बंदी घालण्याच्या विरोधाकडे इशारा केला. पोम्पिओ यांनी बुधवारी मसूद अजहरचे नाव न घेताच ट्विट केले, ‘जग चीनच्या मुस्लिमांप्रती लाजिरवाण्या ढोंगीपणाला सहज करु शकत नाही. एकीकडे चीन आपल्या देशात लाखो मुस्लिमांवर अत्याचार करत आहे, तर दुसरीकडे हिंसक मुस्लीम दहशतवादी संघटनांना संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांपासून वाचवत आहे.’

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.