bomb attack in Afghan : अफगानिस्तानातील बॉम्ब स्फोटांची मालिका थांबेना; आता झाला कुंदूजमधील एका मशीदीत बॉम्ब स्फोट, 30 जणांचा मृत्यू
कुंदूज : अफगानिस्तानातील (Afghanistan) बॉम्ब स्फोटांची (Bomb blasts) मालिका थांबता थांबोना. आता 24 तास होण्याच्या आधीच पुन्हा एकदा अफगानिस्तान बॉम्ब स्फोटाने हादरले. यावेळी अफगानिस्तान मधील कुंदूजमधील (Kunduz) एका मशीदीत बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटात किमान 30 एक जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याच्याआधी अफगानिस्तानमधील काबुल, मजार शरीफ आणि कुंदूजमध्ये बॉम्ब […]
कुंदूज : अफगानिस्तानातील (Afghanistan) बॉम्ब स्फोटांची (Bomb blasts) मालिका थांबता थांबोना. आता 24 तास होण्याच्या आधीच पुन्हा एकदा अफगानिस्तान बॉम्ब स्फोटाने हादरले. यावेळी अफगानिस्तान मधील कुंदूजमधील (Kunduz) एका मशीदीत बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटात किमान 30 एक जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याच्याआधी अफगानिस्तानमधील काबुल, मजार शरीफ आणि कुंदूजमध्ये बॉम्ब स्फोट झाले होते. पहिला स्फोट हा येथील मजार शरीफमधील एका शीया मशीदीत (Masjid) झाला होता. तर आताही मजार-ए-शरीफमध्ये झालेल्या स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला होता. तर 40 हुन अधिक जखमी झाले. जखमींनी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मजार-ए-शरीफ मशीदीमध्ये (Mazar-e-Sharif Mosque) झालेल्या बॉम्ब स्फोटाची जबाबदारी इस्लामिक स्टेट ने घेतली आहे.
मावली सिंकदर मशीदीत बॉम्ब स्फोट
एका दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, कुंदूज प्रांतातील मावली सिंकदर मशीदीत आज दुपारी बॉम्ब स्फोट झाला. त्यावर माहिती देताना मशीदीचे इमाम यांनी माहिती दिली. तसेच त्यांनी, या घडनेत किमान 30 जणांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शी असणाऱ्यांनी सांगितले आहे. तर जखमींनी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
30 जनांचा मृत्यू
याच्याआधी अफगानिस्तानमधील काबुल, मजार शरीफ आणि कुंदूजमध्ये बॉम्ब स्फोट झाले होते. त्यानंतर आता पुन्हा कुंदूजमध्ये बॉम्ब स्फोट झाला. ज्यात 30 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जन जखमी झाले. या झालेल्या बॉम्ब स्फोट हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र आतापर्यंत झालेले हल्ले हे अल्पसंख्यांक असणाऱ्या शीया मुस्लिम समुदायावर झाले आहेत. त्यांनी निशाणा करण्यात आला आहे. तर बॉम्ब स्फोट घडविण्याची पद्धत इस्लामिक स्टेट शी संबंधित संघटना इस्लामिक स्टेट इन खुरासान प्रोविंस च्या सारखी आहे.
नमाजावेळी झाला स्फोट
उत्तरी मजार-ए-शरीफच्या मुख्य रूग्णालयाचे डॉक्टर गौसुद्दीन अनवरी यांनी सांगितले की, उत्तरी मजार-ए-शरीफ मध्ये तीन स्फोट झाले. ज्यात किमान 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 जन जखमी झाले आहे. ज्यांना रूग्णवाहिका आणि खाजगी वाहनातून रूग्णालयात आणण्यात आले. रमजानच्या या पवित्र महिन्यात उत्तरी मजार-ए-शरीफमधील मावली सिंकदर मशीदीत नमाजच्या वेळी हा स्फोट झाला.
दहशतवादी हल्ल्यांचा तीव्र निषेध
यानंतर अफगानिस्तानमध्ये झालेल्या या स्फोटाचा निषेध संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदने नोंदवला. तसेच परिषदेने याप्रकरणी एक प्रेस स्टेटमेंट जारी केले आहे. त्यात त्यांनी, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद या दहशतवादी हल्ल्यांचा तीव्र निषेध करते; हे अफगाणिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याक समुदायांसह नागरीक आणि नागरी पायाभूत सुविधांवर हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
UN Security Council issues a press statement on Afghanistan, strongly condemning the string of terror attacks; these follow other recent attacks against civilians & civilian infrastructure, including in religious minority communities, across Afghanistan. pic.twitter.com/fBVqJkg0d0
— ANI (@ANI) April 22, 2022