अमेरिकेत भारतीय वंशाच्या अनिकाचं Covid-19 औषध बनवण्यावर संशोधन, 18 लाख रुपये जिंकले
अमेरिकेतील भारतीय वंशाची अनिका चेब्रोलू हिला कोरोना विषाणूचं (CoronaVirus) औषध शोधण्यावर संशोधन केल्यानं पुरस्कार मिळाला आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय वंशाची अनिका चेब्रोलू हिला कोरोना विषाणूचं (CoronaVirus) औषध शोधण्यावर संशोधन केल्यानं पुरस्कार मिळाला आहे. यानुसार तिला पुरस्कारासोबत 25,000 डॉलर म्हणजेच जवळपास 18.34 लाख भारतीय रुपये मिळाले आहेत. CNN ने दिलेल्या वृत्तानुसार टेक्सासमध्ये राहणाऱ्या अनिका चेब्रोलू (Anika Chebrolu) हिने कोविड-19 च्या उपचारासाठी संभाव्य औषध बनवण्यावर संशोधन केल्याने तिने 2020 3M यंग सायन्टिस्ट चॅलेंज जिंकलं आहे. अनिकाचं वय अवघं 14 वर्षे आहे (Anika of Indian origin won 18 lakh rupees for the research of covid 19 medicine in America).
अनिकाने एक अणु (Molecule) विकसित केलाय, जो कोरोना विषाणूच्या एका निश्चित प्रोटीनवर परिणाम करुन विषाणूचा प्रभाव थांबवेल. ABC न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अनिका म्हणाली, “मी SARS-CoV-2 विषाणूच्या एका निश्चित प्रोटीनला निकामी करु शकेल असा अणू शोधला आहे. प्रोटीन निकामी झाल्याने कोरोना विषाणूचा प्रभाव शून्य होईल.”
यावर्षाच्या सुरुवातीला अनिका हंगामी फ्ल्यूसोबत लढण्यासाठीच्या पद्धतींवर संशोधन करत होती. मात्र, जगभरात कोरोना साथीरोगाने आकांडतांडव केल्यानंतर अनिकाने आपलं संशोधन कोरोनावर केंद्रीत केलं.
अनेक कम्प्युटर प्रोग्रामचा उपयोग
अनिकाने अत्यंत संसर्गजन्य असलेल्या कोरोना विषाणूवर प्रभावी औषध शोधण्यासाठी अनेक कम्प्युटर प्रोग्रामचाही उपयोग केला. यातून तिने संबंधित अणु SARS-CoV-2 विषाणूत कसा आणि कोठून प्रवेश करेल याचा शोध घेतला. अनिकाने कोरोना वरील औषध शोधण्यासाठी सिलिको पद्धतीचा उपयोग केला.
हेही वाचा :
बरे झालेल्या कोरोना रुग्णांना अनेक महिन्यांपर्यंत आजाराच्या लक्षणांचा त्रास : ऑक्सफर्ड
Donald Trump | पराभव झाल्यास देश सोडून जावं लागेल, ट्रम्प यांची भावनिक साद
चीनचा भयानक प्लॅन! अमेरिकन नागरिकांचे डीएनए आणि मेडिकल डाटाही गोळा करण्याचं काम सुरु?
Anika of Indian origin won 18 lakh rupees for the research of covid 19 medicine in America