आर्चीच्या जन्मदिनी केट मिडलटनने जुना फोटो शेअर केला, या इंस्टा पोस्टनं अनेकांची मनं जिंकली
प्रिंस हॅरी (Prince Harry) आणि मेगन मार्कल (Meghan Markle) यांचा मुलगा आर्ची हॅरिसन माऊंटबेटन-विंडसर (Archie Harrison Mountbatten-Windsor) याचा आज (7 मे) दुसरा जन्मदिवस आहे.
लंडन : प्रिंस हॅरी (Prince Harry) आणि मेगन मार्कल (Meghan Markle) यांचा मुलगा आर्ची हॅरिसन माऊंटबेटन-विंडसर (Archie Harrison Mountbatten-Windsor) याचा आज (7 मे) दुसरा जन्मदिवस आहे. या निमित्ताने डचेस आणि ड्यूक ऑफ केम्ब्रिज (Duchess and Duke of Cambridge) केट मिडलटन आणि प्रिंस विलियमने केंसिंग्टन पॅलेसच्या (Kensington Palace) अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शाही परिवारातील इतर सदस्यांसोबतचा आर्चीचा फोटो पोस्ट केलाय. त्यानंतर हा खास फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय (Archie Harrison Mountbatten-Windsor get birthday wishes from Kensington Palace official Instagram page).
केट आणि विलियमने सोशल मीडियावर आर्चीचा हा फोटो शेअर करत त्याला जन्मदिनानिमित्त सदिच्छा दिल्यात. त्यांनी फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “आर्चीला त्याच्या दुसऱ्या जन्मदिनानिमित्त खूप साऱ्या सदिच्छा.” केट आणि विलियमने ही पोस्ट केल्यानंतर काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. हा फोटो आर्चीच्या नामकरणाच्या वेळचा असल्याचं सांगितलं जातंय. या फोटोत आर्चीसोबत प्रिंस चार्ल्स, मेगन मार्कल, केट, विलियम, कॅमिला, मेघनची आई डोरिया यांच्यासह राजकुमारी डायनाच्या बहिणी दिसत आहेत.
View this post on Instagram
स्वयंसेवी संस्थेच्या वेबसाईटवर वक्तव्य करत कोरोना लसीकरणाला पाठिंबा
आर्चीचा जन्म 6 मे 2019 रोजी झाला होता. सध्या मेघन आणि हॅरी (डचेस आणि ड्यूक ऑफ ससेक्स) आता अमेरिकेत राहत आहेत. आर्चीच्या दुसऱ्या जन्मदिनानिमित्त त्यांनी कोरोनो संसर्गाला संपवण्याच्या उद्देशाने वॅक्सिन इक्विटीच्या पाठिंब्यासाठी कॉल करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या वेबसाईटवर एक वक्तव्य जारी केलंय.
“कोरोना लस प्रत्येकाला मिळत नाही तोपर्यंत वास्तवात कोरोना संपू शकत नाही”
कॅलिफोर्नियामध्ये राहत असलेल्या शाही कुटुंबातील हॅरी आणि मेगनने म्हटलं, “आम्हाला आर्चीच्या जन्मदिनाचा सन्मान करण्यासाठी यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीचा विचार करु शकत नाही. जगात दुर्बल घटकांच्या लसीकरणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजे. कारण जोपर्यंत कोरोना लस प्रत्येकाला मिळत नाही तोपर्यंत वास्तवात कोरोना संपू शकत नाही.”
“दोघे लवकरच एका मुलीचे आईवडिल होणार, मुलीचं नाव अद्याप ठरलं नाही”
मागील काही दिवसांपूर्वी प्रिंस हॅरी (Prince Harry) आणि मेगन मार्कलने (Meghan Markle) ओप्रा विन्फ्रे (Oprah Winfrey) यांच्या मुलाखतीत दोघे लवकरच एका मुलीचे आईवडिल होणार असल्याचा खुलासा केला होता. दोघेही आपल्या दुसऱ्या बाळाबाबत खूपच उत्सूक आहेत. असं असलं तरी त्यांनी अद्याप आपल्या मुलीचं नाव अंतिम केलेलं नाही.
हेही वाचा :
ब्रिटनचा राजपुत्रही ‘सैराट’, बाळाचं नाव ‘आर्ची’ ठेवलं!
व्हिडीओ पाहा :
Archie Harrison Mountbatten-Windsor get birthday wishes from Kensington Palace official Instagram page