इटलीमध्ये ‘या’ मांसावर बंदी, नियमाचे उल्लंघन केल्यास 55 लाखांचा दंड

इटली हा देश त्याच्या एका निर्णयाने चर्चेत आला आहे. या देशाने लॅबमध्ये तयार होणाऱ्या मांसावर बंदी घातली आहे. इटलीमध्ये सध्या उजवे विचारसरणीचे जॉर्जिया मेलोनी यांचे सरकार आहे. मेलोनी या ब्रदर्स ऑफ इटली पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार चालवित आहेत.

इटलीमध्ये 'या' मांसावर बंदी, नियमाचे उल्लंघन केल्यास 55 लाखांचा दंड
italy meloni government ban lab meatImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 24, 2023 | 9:07 PM

इटली | 24 नोव्हेंबर 2023 : इटलीने नुकतीच मासांवर बंदी घातली आहे. हे मांस कृत्रिम मांस असून जे प्रयोग शाळेत तयार केले जाते. युरोपमध्ये प्रथमच अशा प्रकारचा निर्णय झाला आहे. यापूर्वी कोणत्याच युरोपीय देशाने अशा प्रकारच्या कृत्रिम मासांवर बंदी घातली नव्हती. जर या निर्णयाचे पालन केले नाही तर 60 हजार यूरो म्हणजेच भारतीय रुपयांत 55 लाखांचा जबर दंड बसणार आहे. या कृत्रिम मासंबंदी साठी संसदेत मतदान झाले तेव्हा बाजूने 159 तर विरोधात 53 मते पडली. परंतू याचा प्रभाव इटली आणि युरोपमध्ये पहायला मिळणार नाही. कारण जगात अमेरिका आणि सिंगापूर या दोन देशातच लॅबमध्ये तयार केलेल्या मांसाला मानवास खाण्याची परवानगी आहे.

इटलीच्या खाद्य संस्कृतीला या कृत्रिम मांसामुळे धोका निर्माण झाला असल्याने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. इटलीमध्ये शेतकऱ्यांची मोठी मजबूत लॉबी आहे. मोठ्या काळापासून शेतकऱ्यांनी कृत्रिम मासांवर बंदीची मागणी केली होती. या निर्णयानंतर शेतकरी आनंदीत झाले आहेत. इटली या निर्णयाने पारंपारिक शेती आणि शेतकरी याचं रक्षण करु इच्छीत आहे.

या संघटनांनी नाराजी व्यक्त केली

कृत्रिम मासांवरील बंदीचा काही संघटनांना झटका बसला आहे. प्राणी मित्र संघटना, भूतदया असणाऱ्या संघटनांना हा निर्णय जिव्हारी लागणार आहे. त्यांच्या मते लॅबोरेटरीत तयार झालेले मांस हे पर्यावरणासाठी चांगले आहे. कारण यातून कार्बन उत्सर्जन रोखायला मदत होते. युनाटेड नेशनच्या एका अहवालानूसार आर्टीफिशियल मीटला जर प्रोत्साहन दिले तर फूड सेक्टरमुळे निर्माण होणारे 92 टक्के कार्बनचे उत्सर्जनला कमी करण्यास मदत मिळणार आहे.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.