जितकी सुंदर तितकीच मादक, जगातील ‘सर्वात स्वैराचारी स्त्री’, सर्पदंश करून केली आत्महत्या
आपल्या मादक सौंदर्याने तिने संपूर्ण जगाला संमोहित केले होते. तिचे नाव इतिहासात एक रहस्यमय व्यक्तिमत्व म्हणून नोंदवले गेले. ती जितकी सुंदर आणि मादक होती त्यापेक्षा अधिक पाताळयंत्री आणि क्रूर होती.
तिच्या काळातील ती जगातील सर्वात श्रीमंत आणि सुंदर स्त्री होती. परंतु, स्वत:च्या फायद्यासाठी तिने अनेक पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवले. तिच्या सौंदर्याला भाळून अनेक राजे, बडे बडे सरदार तिच्यासाठी काहीही करायला तयार होत असत. पण, सत्तेच्या लालसेपोटी ती त्यांना नंतर मारायची. सत्तेसाठी तिने धाकट्या भावाला विष देऊन मारले. तिच्या सांगण्यावरून तिच्या बहिणीचीही हत्या करण्यात आली. पण, तिच्या जीवनाची अखेरही तशीच झाली. स्वतःला साप चावून घेऊन आत्महत्या केली. रहस्यमय आणि कारस्थानी कारवायांसाठीदेखील ओळखली जाणारी ती स्त्री होती इजिप्शियन इतिहासातील सर्वात सुंदर आणि मादक अशी इजिप्तची राणी क्लियोपात्रा…
क्लियोपात्रा 17 वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. परंतु, वडिलांच्या इच्छेनुसार तिला आणि तिचा धाकटा भाऊ टॉलेमी डायोनिसस यांना संयुक्तपणे वडिलांचे राज्य मिळाले. इजिप्शियन प्रथेनुसार ती भावाची पत्नी होणार होती. पण, राज्यसत्तेच्या संघर्षामुळे भाऊ टॉलेमी हा सीरियाला पळून गेला. पण, ती कधी न कधी परत येईल यांची क्लियोपात्राला भीती वाटत होती. त्या दडपणाखालीच ती जगत होती. याच दरम्यान ज्युलियस सीझर हा शत्रू पॉम्पी याला शोधत इजिप्तमध्ये आला होता.
ज्युलियस सीझर याने पहिल्यांदा क्लियोपात्राला पाहिले. तिला पाहताक्षणीच तो तिच्या सौंदर्यावर आणि मादक डोळ्यांवर मोहित झाला. क्लियोपात्राच्या सौंदर्याच्या जाळ्यात तो अडकला. क्लियोपात्रा याच्या पळून गेलेल्या भावाला ठार करण्याचे आणि तिला इजिप्तची राणी करण्याचे वचन दिले. ज्युलियस सीझर याने टॉलेमीशी युद्ध करून त्याला ठार केले.
मोठा भाऊ टॉलेमी मारला गेल्यामुळे ती काहीशी निश्चिंत झाली होती. पण, तिला आणखी एक मोठा धोका होता तो म्हणजे लहान भाऊ धाकट्या भावाचा. प्रथेनुसार तिने दुसऱ्या भावासह इजिप्तच्या सिंहासनावर बसून एकत्र राज्य करण्यास सुरुवात केली. पण, त्यालाही तिने विष देऊन मारले. तिच्या मार्गात आणखी एक कट होता ती क्लियोपात्राची बहीण आर्सिनोई. क्लियोपात्रा हिने तिच्यावर मारेकरी पाठवून तिचीही हत्या केली.
क्लिओपात्रा हिला ज्युलियस सीझरकडून एक मुलगा झाला. त्याचे नाव सीझेरियन असे ठेवले होते. इ.स.पूर्व 46 मध्ये क्लिओपात्रा ही ज्युलियस सीझरची मांडलिक राणी म्हणून रोमला गेली. ती सीझरच्या महालात रहात होती. लहान भावाच्या हत्येनंतर तिने मुलगा सीझेरियन याला सह शासक घोषित करून त्याला टॉलेमी 15 वा असे नाव दिले.
इ.स.पूर्व 43 च्या दरम्यान लिबरेटर्सचे गृहयुद्ध सुरु झाले. या युद्धात क्लिओपात्रा हिने सीझरचा नातू आणि वारस ऑक्टाव्हियन, मार्क अँटनी आणि मार्कस एमिलियस लेपिडस यांची बाजू घेतली. वास्तविक ज्युलियस सीझर याने क्लियोपात्राला इजिप्तची राणी बनण्यास मदत केली होती, मात्र असे असतानाही तिने मार्क अँटनी आणि ऑक्टेव्हियन या त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना मदत केली. याचे कारण म्हणजे तिची आणि अँटनी यांची तारसोस येथे भेट झाली होती. त्यावेळी त्यांच्यात प्रेमसंबंध जुळून आले होते. क्लिओपात्रा हिने त्याला पार्थियन साम्राज्य आणि आर्मेनियावर केलेल्या आक्रमणांसाठी पैसे आणि लष्करी मदत पुरवली होती.
ऑक्टाव्हियन याने पुढे क्लिओपात्राविरुद्ध युद्ध घोषित केले. त्याने अँटनी आणि क्लिओपात्रा यांच्याविरोधात लढाई सुरु केली. ऍक्टियम येथे झालेल्या या लढाईत ऑक्टाव्हियन याने क्लिओपात्राच्या नौदल ताफ्याचा पराभव केला. या पराभवामुळे अँटनी आत्महत्या केली. ऑक्टाव्हियन याने रोमन विजयी मिरवणुकीत क्लिओपात्राला आणण्याची योजना आखली. आहे याची माहिती तिला मिळाली. पण, अपमानित झालेल्या क्लिओपात्रा हिनेही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.
ऑक्टोव्हिअन याला याची माहिती मिळताच त्याने सैनिकांना क्लिओपात्राला आत्महत्या करण्यापासून रोखण्याचे आदेश दिले. परंतु, ज्यावेळी सैनिक तिच्यापर्यंत पोहोचले त्यावेळी ती मरून पडली होती. तिच्या दोन दासी आणि अंजीराच्या टोपलीत त्यांना एक साप सापडला. रोमला परत गेल्यावर होणाऱ्या विजयी मिरवणूकीत नेऊन क्लिओपात्राला अपमानित करायचे ऑक्टाव्हियन याचे ते स्वप्नच राहिले. तिच्या जीवनावर आधारित 1963 मध्ये एक हॉलीवूड चित्रपट बनवण्यात आला. ज्यामध्ये लिझ टेलर हिने क्लियोपात्राची भूमिका साकारली होती.