Sunita Williams : अंतराळात भगवत गीता – समोसे आणि स्पेस शटल कोलंबिया अपघाताच्या कटु स्मृती
लॉंच नंतर 25 दिवसांत स्टारलायनर स्पेसक्राफ्टच्या कॅप्सूलमध्ये 5 हेलियम लीक झाले होते,. 5 थ्रस्टर्सनी काम करणे बंद केले होते. शिवाय एक प्रॉपेलेंट वॉल्व पूर्ण बंद झाला नाही. त्यामुळे स्टारलायनरमधून सुनीता यांना आणणे धोकादायक बनले होते.
मुळच्या भारतीय असलेल्या 58 वर्षीय अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि 61 वर्षीय बुच विल्मोर यांना अंतराळात आता आठ महिन्याचा मुक्काम ठोकावा लागणार आहे. गेल्या 5 जूनला स्टारलायनर अवकाश मोहीमेद्वारे हे अंतराळवीर अवघ्या आठवड्याभराच्या टेस्टींग ट्रीपसाठी आंतराळ स्थानकात गेले होते. परंतू आता चक्क आठ महिने त्यांचा अंतराळात मुक्काम असणार आहे. त्यातील चार महिने संपले आहेत.आता सुनीता यांना आणखी चार महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात प्रतिकूल परिस्थितीत राहावे लागणार आहे. स्टारलायनर हे यान बोईंग कंपनीचे होते. 400 कोटी डॉलरचा हा प्रकल्प आता डब्यात गेला आहे. या यान अंतराळात यानाचे थ्रस्टर वेळेत पेटले नाहीत. शिवाय त्यांच्यातून हेलियम वायू देखील लिकेज झाला त्यातून सुनीता आणले कमालीचे रिस्की झाले होते.. नासाच्या 21 वर्षांपू्र्वी जग हादरविणाऱ्या एका अवकाश अपघाताच्या कटु स्मृती जाग्या झाल्या. त्यानंतरच नासाने धोकादायक स्टारलायनरमधून सुनीता यांना परत आणण्याचा प्लान रद्द केल्याचे म्हटले जात आहे.
कल्पना चावला या आणखी एका भारतीय वंशाच्या अंतराळवीराच्या अपघाताच्या कटू स्मृती या घटनेने जाग्या झाल्या आहेत. दक्षिण अमेरिकेत स्पेस शटर कोलंबिया पृथ्वीवर परत येत असताना लॅंडींगला अवघी 16 मिनिटं शिल्लक असताना हवेतच रॉकेटचा ब्लास्ट होऊन अंतराळवीर कल्पना चावला यांच्यासह इतर सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता. ही दुर्घटना 1 फेब्रुवारी 2003 रोजी घडली होती. याआधी देखील नासाचे स्पेस शटल चॅलेंजरला 28 जानेवारी 1986 रोजी अपघात होऊन क्रुचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत तब्बल 14 अंतराळवीरांचा अशा प्रकारच्या अपघातात मृत्यू झाला आहे. या दोन अपघातांमुळे बोईंग स्टारलाइनर हे स्पेस अंतराळवीरांना न आणता रिकाम्या हाती आज ( रविवार ) परणार असल्याचे नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी म्हटले आहे, बिल नेल्सन यांनीच या दोन अपघातांची चौकशी केली होती…. ते पुढे म्हणाले की नासाकडून या दोन मोठ्या चुकांचा इतिहास पाठीशी असल्यानेच स्टायलायनरमधून सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आणण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
सुनीता विल्यम्स या मुळच्या गुजरात येथील अहमदाबादच्या आहेत.सुनीता यांचा जन्म 19 सप्टेंबर, 1965 रोजी अमेरिकेतील ओहियो प्रांतातील क्लीवलॅंडमध्ये झाला होता. सुनीताचे वडील डॉ. दीपक पांड्या एक प्रख्यात न्यूरोएनाटोमिस्ट होते. दीपक पांड्या यांचा जन्म गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील झुलासान गावात त्यांचा जन्म झाला होता. त्या अमेरिकेत जन्मल्या असल्या तरी त्या हिंदू देवता गणेशाच्या निस्सीम भक्त आहेत आणि अंतराळ उड्डाण दरम्यान त्यांनी नेहमीच हिंदूंचा पवित्र ग्रंथ भगवद् गीता सोबत घेऊन गेल्या होत्या. त्या सोसायटी ऑफ एक्सपेरिमेंटल टेस्ट पायलट संघटनेच्या सदस्य आहेत. विल्यम्स यांचा विवाह ओरेगॉनमधील फेडरल पोलिस अधिकारी मायकेल जे. विल्यम्स यांच्याशी झाला होता.