सावधान ! पास्ताने घेतला जीव, रात्री झोपला तो सकाळी उठलाच नाही

| Updated on: Sep 14, 2023 | 11:52 PM

Pasta take life : कोणत्याही वस्तू खातांना आधी विचार केला पाहिजे. कारण अनेक गोष्टी हे विष बनू शकते. ज्यामुळे जीव देखील धोक्यात येऊ शकतो. अशीच एक घटना पुढे आली आहे. जी वाचून अनेकांना धक्का बसलाय.

सावधान ! पास्ताने घेतला जीव, रात्री झोपला तो सकाळी उठलाच नाही
Follow us on

Pasta News : फास्ट फूडचे अनेक जण शौकीन आहेत. अनेकांना फास्ट फूड खूप आवडतं. जवळपास प्रत्येक घरात काही ना काही फास्ट फूड असतातच. यामध्ये मॅगी आणि पास्ता सारख्या गोष्टींचा समावेश आहे. लहान मुलांचा देखील फास्ट फूडसाठी हट्ट वाढत चालला आहेय. ते आरोग्यासाठी थोडे हानिकारक असले तर अनेर जण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पास्ता खाल्ल्याने मृत्यू देखील होऊ शकतो? होय, असेच एक प्रकरण सध्या चर्चेत आहे, ज्याने लोकांना धक्का बसला आहे.

बेल्जियममधील एका व्यक्तीचा पास्ता खाल्ल्याने मृत्यू झालाय. या व्यक्तीने शिळा पास्ता खाल्ला होता, ज्याची किंमत त्याला जीव देऊन चुकवावी लागली. अनेक जण उरलेलं जेवण फ्रीजमध्ये ठेवून देतात. पण हे शिळं अन्न जीवघेणं ठरु शकते. 5 दिवस जुना पास्ता खाल्ल्याने त्याची प्रकृती इतकी बिघडली की त्याचा मृत्यू झाला.

मिररच्या रिपोर्टनुसार, एजे याचं वय फक्त 20 वर्ष होते. त्याने पास्ता बनवला. पण तो खाल्ला नाही. नंतर त्याने पाच दिवसानंतर भूक लागली म्हणून सॉस टाकून हा पास्ता खाल्ला.  पण अर्ध्या तासानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्याला पोटदुखी, डोकेदुखी तसेच जुलाब, उलट्या अशा समस्या होऊ लागल्या. आता या समस्यांनंतर त्याला बरे वाटत नव्हते, म्हणून तो झोपायला गेला, पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला नाही कारण त्याचा मृत्यू झाला होता.पा

शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, ही घटना खूप जुनी आहे, 2008 सालची, पण आता ही घटना सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होऊ लागली आहे. ही बातमी जवळपास सर्वच परदेशी संकेतस्थळांवर पुन्हा प्रसिद्ध झाली असून चर्चेत आहे.