Sunita Williams : अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सचा अखेर आईशी संवाद… मोठा खुलासा, काय झालं मायलेकीचं बोलणं ?
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि काही अंतराळवीर हे अंतराळात अडकले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून अडकलेल्या सुनीता विल्यम्सबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. तिने तिच्या आईशी संपर्क साधला आहे.
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स सुनीता विल्यम्स आणि काही अंतराळवीर हे अंतराळात अडकले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते अंतराळातच आहे. त्यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही त्या सर्वांना पृथ्वीवर येण्यासाठी आणखी काही काळ लागेल असं सांगितलं जात आहे. याचदरम्यान बऱ्याच दिवसानंतर सुनीता विल्यम्स हिच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुनीता हिचा अखेर तिच्या आईशी संपर्क झाला आहे. सुनीताने तिची आई बोनी पंड्या हिच्याशी संवाद साधत तेथील तांत्रिक गडबडीविषयी माहिती दिली.
काही तांत्रिक कारणांमुळे (पृथ्वीवर) परत येण्यासाठी विलंब होत असल्याचे सुनीता यांनी आईला सांगितलं. मात्र काही काळांतच आपण सुरक्षितरित्या पृथ्वीवर परत येऊ, असा विश्वासही तिने आईशी बोलताना व्यक्त केला. तू माझी काळजी करू नकोस, मी सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येईन, असे सुनीत यांनी तिच्या आईला सांगितलं.
काय म्हणाल्या बोनी पंड्या ?
एका न्जूय चॅनेलशी बोलताना सुनीताची आई बोनी पंड्या यांनी प्रतिक्रिया दिली. ‘सुनीताने मला सांगितले की तिची काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल’ असे त्या म्हणाल्या. त्यांची मुलगी बऱ्याच काळापासून अंतराळात अडकली आहे, याबद्दलही त्यांना विचारण्यात आल्यावर त्या म्हणाल्या, ‘ मी एका अंतराळवीराची आी आहे, आणि सुनीताला गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. हे तिचं अंतराळातील तिसरं प्रस्थान आहे. काही अडचणी जरूर असतील, पण त्यात काळजी करण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही. सुनीताला परत आणण्यासाठी नासाने कोणतीही घाई केली नाही. तिच्या सुरक्षेला नासाने पहिलं प्राधान्य दिलंय. त्यामुळेच त्यांनी तिला तेथे काही काळ रहावं लागणार आहे ‘ असं त्यांनी नमूद केलं.
फेब्रुवारीपर्यंत पृथ्वीवर परतणार सुनीता विल्यम्स
नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघे जून महिन्यात बोईंगच्या स्टारलायनर अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले होते. ही मोहीम आठवडाभर चालणार होती, मात्र हीलियम गळती आणि इतर तांत्रिक आव्हानांमुळे त्यांना तिथेच थांबवावे लागले. नासानेही अधिकृत निवेदनात ही परिस्थिती विषद केली होती. आता नव्या अपडेट्सनुसार, विल्मोर आणि सुनीता विल्यम्स हे दोघे पुढल्या वर्षी, म्हणजे फेब्रुवारी 2025 पर्यंत पृथ्वीवर परत येऊ शकतील. एजन्सीच्या SpaceX क्रू-9 मिशनसाठी नियुक्त केलेल्या इतर दोन क्रू सदस्यांसह ते घरी परततील.
कल्पना चावलाच्या मृत्यूनंतर नासाची सावध पावले
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला आणि इतर सहा जणांनी फेब्रुवारी 2003 मध्ये आपला जीव गमावला होता. त्याचे स्पेस शटल कोलंबिया फुटून जळून खाक झाले. स्पेस शटल पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यावर ही दुर्घटना घडली. नासाच्या अधिकाऱ्यांसाठी हा मोठा धक्का होता, त्यामुळे या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता ( सुनीता विल्यम्स आणि सहकाऱ्यांबाबत) नासा विशेष खबरदारी घेत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं.