जगातील वर्षातील सर्वात मोठी अत्याचाराची घटना, नायजेरियात 110 नागरिकांची हत्या

नायजेरियाच्या एका गावात बोकोहराम या दहशतवादी संघटनेने तब्बल 110 शेतकऱ्यांची हत्या करत मोठा नरसंहार केला आहे.

जगातील वर्षातील सर्वात मोठी अत्याचाराची घटना, नायजेरियात 110 नागरिकांची हत्या
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 12:44 AM

आबुजा (नायजेरिया) : नायजेरियाच्या एका गावात बोकोहराम या दहशतवादी संघटनेने तब्बल 110 शेतकऱ्यांची हत्या करत मोठा नरसंहार केला आहे. नायजेरियातील संयुक्त राष्ट्राच्या समन्वयक एडवर्ड कोलन यांनी ही माहिती दिली आहे. आधी मृतांची संख्या 43 आणि नंतर 70 सांगण्यात आली. मात्र, आता ही संख्या 110 पर्यंत पोहचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या दहशतवाद्यांनी या गावातील महिलांचं अपहरण केल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे (At least 110 civilians killed in Nigeria attack says UN).

संबंधित शेतकरी आपल्या शेतांमध्ये काम करत असताना गाड्यांवर आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात जवळपास 110 नागरिकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, तर अनेकजण जखमी झाले आहेत. या गावातील अनेक महिलांचं अपहरण देखील झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा हल्ला या वर्षातील सर्वसामान्य नागरिकांवर झालेला सर्वात हिंसक हल्ला आहे, असं मत संयुक्त राष्ट्राचे समन्वयक एडवर्ड कोलन यांनी व्यक्त केलं आहे. तसेच दोषींना या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची मागणी केली.

या हल्ल्याची अद्याप कुणीही जबाबदारी घेतलेली नाही. मात्र, मागील वर्षभरात बोको हरामकडून या भागात अनेकदा असे हल्ले झाले आहेत. नागरिकांनी देखील याच संघटनेवर आरोप केला आहे. या संघटनेच्या दहशतवाद्यांनी मागील दशकात जवळपास 30 हजार सामान्य नागरिकांची हत्या केली आहे. तसेच जवळपास 20 लाख लोकांना जीवाच्या भीतीने या भागातून विस्थापन करावं लागलं आहे.

नायजेरियाचे अध्यक्ष मोहम्मद बुहारी यांनी नागरिकांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटी भरुन काढण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच या नरसंहाराचा निषेध केला आहे. ते म्हणाले, “बॉर्नो राज्यात दहशतवाद्यांकडून आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या हत्येचा मी निषेध करतो. या निर्घृण हत्येने संपूर्ण देशाला धक्का बसलाय.”

बॉर्नोचे गव्हर्नर उमारा झुलुम यांनी नायजेरिया सरकारला शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी या भागात अधिक जवानांची तैनाती करण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांना सिव्हिल डिफेन्स फायटरमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

हेही वाचा :

शाळेत फी ऐवजी प्लास्टिक बॉटल, पालकांसाठी नवी मोहीम

At least 110 civilians killed in Nigeria attack says UN

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.