China Earthquake : चीनमध्ये भूकंप, अनेक इमारतींना जबरदस्त हादरे, 46 जणांचा मृत्यू! रेस्क्यू ऑपरेशन जारी

सिचुआन प्रांत तिब्बतच्या शेजारी आहे. हा प्रांत भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. 2008 साली आलेल्या सिचुआन प्रांतात आलेल्या भूकंपाने तब्बल 90 हजार जणांचा जीव घेतला होता. 2013 सालीदेखील इथं भूकंप झाला होता. त्यावेळी 200 जण ठार झाले होते.

China Earthquake : चीनमध्ये भूकंप, अनेक इमारतींना जबरदस्त हादरे, 46 जणांचा मृत्यू! रेस्क्यू ऑपरेशन जारी
चीनमध्ये भूकंपImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 9:08 AM

चीनमध्ये सोमवारी भूकंप (China Earthquake) झाला. दुपारी झालेल्या भूकंपामुळे अनेक इमारतींना हादरे बसलेत. या भूकंपामध्ये (Earthquake News) आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढण्याची दाट भीती व्यक्त केली जाते आहे. या भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आलीय. अनेकजण भूकंपाच्या हादऱ्याने जखमीदेखील झाले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने चीनमध्ये (China) भूकंप झाल्याची माहिती जारी केली. सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजून 25 मिनिटांत भूकंप झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

चीनमध्ये कुठे झाला भूकंप?

चीनमधील दक्षिण पश्चिमी भागात असलेल्या सिचुआन प्रांतात भूकंपामुळे प्रचंड हानी झालीय. सिचुआन प्रांतामधील लुडिंग काऊंटीमध्ये सोमवारी दुपारी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून हा भाग जवळपास 226 किलोमीटर दूर आहे. या भूकंपाचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये थरकाप उडवणारी दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

हे सुद्धा वाचा

2008 सालच्या भीषण आठवणी

सिचुआन प्रांत तिब्बतच्या शेजारी आहे. हा प्रांत भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. 2008 साली सिचुआन प्रांतात आलेल्या भूकंपाने तब्बल 90 हजार जणांचा जीव घेतला होता. 2013 सालीदेखील इथं भूकंप झाला होता. त्यावेळी 200 जण ठार झाले होते. 2013 साली आलेल्या भूकंपाची तीव्रता सात रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती.

चीनच्या चेंगदू भागात एकापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यानं तिथे लॉकडाऊन लावण्यात आलंय. त्यामुळे लोकांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही. शिवाय एका घरातील एका व्यक्तीलाच जीवनावश्यक सामान खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे.

भूकंप आल्यास काय करावं?

जर भूकंपाचे हादरे बसू लागले, तर काय करावे? कशी काळजी घ्यावी?, यासाठी काही मार्गदर्शक तत्त्व आपत्कालीन यंत्रणेकडूनही जारी करण्यात आली आहे. भूकंप काळात एखाद्या मजबूत फर्निचरच्या खाली जाऊन बसावं किंवा जमिनीवर खाली बसावं. या दोन्ही गोष्टी शक्य नसतील तर एका कोपऱ्यात चेहऱ्यावर हात ठेवून आपलं डोकं झाकलं जाईल, अशा अवस्थेत बसावं. घराबाहेर असल्यास झाड, खांब किंवा तारांपासून सुरक्षित अंतर ठेवूनच उभं राहावं. गाडीत असाल, तर आपलं वाहन तातडीने थांबवावं आणि गाडीच्या खाली न उतरता आतमध्ये बसून राहावं.

बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.