रशिया आणि आर्मेनियाचा अजरबैजानवर हल्ला; रणभूमीत शेकडोंचा मृत्यू

मागील 33 दिवसांपासून आर्मेनिया (Armenia) आणि अजरबैजानमध्ये (Azerbaijan) युद्ध सुरु आहे. या युद्धात यावेळी पहिल्यांदाच आर्मेनियाचं विध्वंसक रूप सगळ्या जगाला दिसलं. 32 दिवसांपासून इस्लामिक देशांकडून आर्मेनियावर हल्ला सुरु होता. पण यावेळी आर्मेनीयाने रशियाच्या मदतीने अजरबैजानवर जोरदार हल्ला केला आहे. (Attack of Armenia on Azerbaijan with the help of Russia caused major casualties in Azerbaijan)

रशिया आणि आर्मेनियाचा अजरबैजानवर हल्ला; रणभूमीत शेकडोंचा मृत्यू
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 1:00 AM

येरेव्हान : मागील 33 दिवसांपासून आर्मेनिया (Armenia) आणि अजरबैजानमध्ये (Azerbaijan) युद्ध सुरु आहे. या युद्धात यावेळी पहिल्यांदाच आर्मेनियाचं विध्वंसक रूप सगळ्या जगाला दिसलं. 32 दिवसांपासून इस्लामिक देशांकडून आर्मेनियावर हल्ला सुरु होता. पण यावेळी आर्मेनीयाने रशियाच्या मदतीने अजरबैजानवर जोरदार हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे अजरबैजानची मोठी जीवितहानी झाल्याचं सांगितलं जात आहे. (Attack of Armenia on Azerbaijan with the help of Russia caused major casualties in Azerbaijan)

मागील काही दिवसांपासून रशिया आर्मेनिया आणि अजरबैजान या दोन देशांमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना नागोर्नो-काराबाखवरुन सुरु असलेला हा संघर्ष थांबावा असं वाटत होतं. पण, तुर्कीच्या कटकारस्थानामुळे अजरबैजान वारंवार युद्धविरामाचं उल्लंघन करत राहिला. रशियानं अनेकदा अजरबैजानला इशाराही दिला. तसेच तुर्कीला या युद्धात हस्तक्षेप न करण्याची समजही दिली. पण, नागोर्नो-काराबाखवरुन संघर्ष काही थांबला नाही. शेवटी स्वत: रशियाच आपल्या सर्व प्रगत हत्यारांसह युद्धाच्या मैदानात उतरला आहे.

रशियाच्या BM-30 स्मर्चमुळे बर्दा शहराचा विध्वंस

अर्मेनिया देशाला रशियाकूडन सैन्याची तसेच आधुनिक शस्त्रांची मदत मिळत आहे. त्यामुळे अर्मेनियाची ताकद वाढली आहे. रशियाकडून मदत मिळताच आर्मेनियानं अजरबैजानच्या बर्दा शहरावर स्मर्च मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चरनं जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात अजरबैजानची अनेक सैनिक मारले गेले आहेत. तसेच रशियाच्या BM-30 स्मर्चनं बर्दाच्या रहिवाशी भागात चांगलाच विध्वंस केल्याची माहिती आहे. रशियानं बर्दा भूमिवर केलेल्या या हल्ल्यांमुळे अजरबैजानच नाही, तर तुर्की देशही घाबरला आहे. कारण युद्धाच्या 32 दिवसांच्या कालावधित रशियाने बीएम-30 स्मर्चने केलेला हल्ला सर्वात विध्वंसक मानला जात आहे. BM-30 स्मर्च काय आहे ?

BM-30 स्मर्च हे रशियाचे मल्टिपल रॉकेट लॉन्चर सिस्टिम आहे. ज्याची मारक क्षमता 100 किलोमीटर आहे. स्मर्च 30 सेकंदांमध्ये 12 मिसाईल्स डागू शकतो. रशियाची प्रत्येक मिसाईल त्याच्यासोबत 200 किलो स्फोटकांचा मारा करु शकते. BM-30 स्मर्चमध्ये ऍडव्हान्स नेव्हिगेशन आणि कंट्रोल सिस्टिम लावलेली आहे. स्मर्चची त्याच्या टार्गेटवर अचूक निशाणा साधण्याची क्षमता चांगली असल्याचं सांगितलं जातं. BM-30 स्मर्चचा रशियानं सीरिया युद्धातही वापर केलेला होता. आता हेच विध्वंसक हत्यार रशियानं अजरबैजानला धडा शिकवण्यासाठी आर्मेनियाला दिलं आहे.

रशिया आणि आर्मेनियाची अजरबैजानच्या 2 शहरांवर नजर

रशिय़ा आणि आर्मेनिया अजरबैजानच्या दोन शहरांवर हल्ला करण्याच्या तयारित आहे.गांजा आणि बर्दा अशी या दोन शहरांची नावं आहेत. गांजा शहर हे शहर आर्मेनियाची राजधानी येरेवनपासून 166 किलोमीटर दूर आहे. तर बर्दा हे शहर येरेवनपासून जवळपास 223 किलोमीटर दूर आहे. अजरबैजानची राजधानी बांकूही पुतिन यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती आहे. ही शहरं उद्धवस्त करण्यासाठी रशियानं S-400 आणि S-300 या मिसाईल डिफेंस सिस्टिम काराबाखच्या रणभूमीत उतरवल्या आहेत. रशियाच्या गुप्तहेर संघटनेच्या मदतीनं आर्मेनियानं गांजा आणि बर्दा शहरावर हल्ला करण्यासाठी महत्त्वाची अशी ठिकाणंही निवडली आहेत. सध्या अजरबैजाननं गांजा आणि बाकू शहरात किती सैन्य तैनात केलं आहे याची सर्व माहिती सध्या आर्मेनियाच्या सैन्याजवळ आहे.

दरम्यान या सर्व घटना पाहता, आता रशियानं तुर्की-अजरबैजान आणि पाकिस्तानच्या विरोधात युद्धात उडी घेतली आहे. या युद्धात 20 दिवसांमध्ये जवळपास 52 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या 33 दिवस उलटूनही हे युद्ध थांबण्याचे कोणतेही स्पष्ट चिन्हं नाहीत.

संबंधित बातम्या :

आर्मानिया आणि अजरबैजान युद्धाचं कारण काय? भारत कुणाच्या बाजूने?

इराणच्या इशाऱ्याने विध्वंसक युद्धाची शक्यता, आर्मेनिया आणि अजरबैजान देशांमध्ये हजारो निष्पापांचे बळी

चीन-अमेरिकेतली तणातणी वाढली, अमेरिकेचे 24 तासात दोन निर्णय, चीनच्या चिंतेत वाढ

(Attack of Armenia on Azerbaijan with the help of Russia caused major casualties in Azerbaijan)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.