“कोरोना लस निर्यातीत भारताने दाखवलेली उदारता विसरणार नाही”, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांकडून जाहीर कृतज्ञता
आम्ही कोरोना लसीच्या निर्यातीमध्ये भारताने दाखवलेली उदारता कधीही विसरु शकणार नाही, असं मत ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केलंय.
Australia PM Scott Morrison thanks to India for Covid vaccine export : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कोविड-19 संकटावर फोनवर चर्चा जाली. याबाबत माहिती देताना मॉरिसन यांनी ट्विट केलंय. ते म्हणाले, “आपले मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी कोविड-19 संकटात भारतासोबत उभे राहिल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे आभार मानले. ऑस्ट्रेलिया व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कंसंट्रेटर देऊन भारताला मदत करत आहे. आम्ही कोरोना लसीच्या निर्यातीमध्ये भारताने दाखवलेली उदारता कधीही विसरु शकणार नाही. जागतिक आव्हानांवर आमचं बारकाईने लक्ष आहे (Australia PM Scott Morrison thanks to India for Covid vaccine export).”
भारत सध्या कोरोना विषाणूच्या (Covid in India) दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. यात दररोज 3-4 लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. दर दिवशी 3 हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. भारतात सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूंच्या व्हेरिएंटमुळे कोरोना संसर्गाने रौद्र रुप धारण केल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे तब्बल एक वर्ष होऊन गेलंय तरीही सरकारकडून कोरोना रुग्णांना पुरेशा वैद्यकीय सोयीसुविधा पुरवण्यात अपयश येत आहे. अनेक ठिकाणी बेड, औषधं, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन इत्यादीची उपलब्धताच नाही. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. या पार्श्वभूमीवर जगातील जवळपास 40 देशांनी भारताला मदत देऊ केलीय. यात ऑस्ट्रेलियाचाही समावेश आहे.
Just spoke with our friend, PM @narendramodi who thanked Australia for standing by India during the #COVID19 crisis. We’re supporting them with ventilators and oxygen concentrators. We won’t forget India’s generosity in exporting vaccines. We’ll work closely on global challenges.
— Scott Morrison (@ScottMorrisonMP) May 7, 2021
भारताकडून ऑस्ट्रेलियाला मदतीसाठी धन्यवाद
2 दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मॅरिस पायने (Marise Payne) यांनी ट्विट करत ऑस्ट्रेलिया या संकटाच्या काळात भारतासोबत असल्याचं म्हटलं. तसेच व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कंसंट्रेटर्सची पहिली खेप विमानाने पाठवली जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यानंतर भारत सरकारकडूनही लगेचच ट्विट करत आभार मानले होते. ऑस्ट्रेलियामधील भारतीय उच्चायोगाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “जागतिक साधीरोगाविरोधात लढण्यासाठी योग्यवेळी मदत केल्याबद्दल पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि मंत्री मॅरिस पायने यांचे आभार.”
भारतात अनेक ऑस्ट्रेलियाचे नागरिक अडकले
भारतात कोरोना विषामूचा संसर्ग पाहता ऑस्ट्रेलियाने भारतातून ऑस्ट्रेलियात येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातलीय. यामुळे अनेक ऑस्ट्रेलियन नागरिकही भारतात अडकले आहेत (Australia Travel Ban From India). यानंतर ऑस्ट्रेलिया सरकारने निर्बंधांनंतरही परत येणाऱ्या नागरिकांना 5 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि दंडाची शिक्षा जाहीर केली. यानंतर जगभरातून ऑस्ट्रेलियावर टीका झाली. यानंतर ऑस्ट्रेलिया सरकारने मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात भारतातील ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांना परत आणण्यासाठी 3 विमानं पाठवणार असल्याचं जाहीर केलं. तसेच या प्रवाशांना परत आणल्यानंतर क्वारंटाईन करण्यात येईल अशीही माहिती देण्यात आली.
हेही वाचा :
World News Bulletin: सीरिया सरकारचा आपल्याच देशातील रुग्णालयावर हल्ला, वाचा जगातील 5 मोठ्या बातम्या
ऑस्ट्रेलियासोबतच्या व्यापारी वादांमुळे चीनच्या समुद्रकिनाऱ्यावर भारतीय जहाजे अडकली
व्हिडीओ पाहा :
Australia PM Scott Morrison thanks to India for Covid vaccine export