Air Strike | बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये 300 मृत्यू, पाकच्या डिप्लोमॅटचं मोठं वक्तव्य
पाकिस्तानातील एका बड्या राजकीय व्यक्तीने दिलेल्या वक्तव्यानुसार, या स्ट्राईकमध्ये जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.
इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राईकबाबत (Balakot Air Strike) पाकिस्तानातील एका बड्या राजकीय व्यक्तीने (Pakistani Diplomat) मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानातील एका बड्या राजकीय व्यक्तीने दिलेल्या वक्तव्यानुसार, या स्ट्राईकमध्ये जवळपास 300 दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा झाला होता. एका न्यूज चॅनलवर मुलाखतीदरम्यान त्यांनी याची माहिती दिली (Balakot Air Strike).
जम्मू-काश्मीरच्या पुपलवामा येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचं उत्तर म्हणून भारताने 26 फेब्रुवारीला नियंत्रण रेषा पार करत पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. हा एअर स्ट्राईक जैश-ए-मोहम्मद नावाच्या दहशतवादी संघटनेच्या ‘प्रशिक्षण शिबिरं’ असणाऱ्या ठिकाणांवर करण्यात आला होता.
पाकिस्तानच्या दाव्याच्या उलट वक्तव्य
बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने केलेल्या दाव्यानुसार, यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पण, पाकिस्तानातील एका बड्या राजकीय व्यक्ती अघा हिलाली यांनी टीव्ही डिबेटमध्ये पाकिस्तानी लष्कराचा नेहमीच पक्ष घेत असतात. अशात हिलाली यांचा हा खुलासा पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या सर्व दाव्यांच्या विरोधात आहे.
‘भारताने आंतरराष्ट्रीय सीमा पार केल्या’
अघा हिलाली ने म्हटलं, “भारताने आंतरराष्ट्रीय सीमेला पार केलं आणि एका युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली होती. यामध्ये 300 मृत्यूंची नोंद करण्यात आली. आमचं टार्गेट त्यांच्यापेक्षा वेगळं होतं. आम्ही त्यांच्या हाय कमांडला टार्गेट केलं होतं. कारण, तिथे उपस्थित असलेले लोक लष्कराचे होते. आम्ही त्यांना सांगितलं की ते जे काही करतील त्याचं उत्तर आम्ही देऊ” (Balakot Air Strike).
‘भारत पाकिस्तानवर हल्ला करणार’
अघा हिलाली यांचं हे वक्तव्य पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाजचे नेते अयाज सादिक यांच्या वक्तव्यानंतर आलं आहे. “जर पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडलं नाही तर भारत रात्री नऊ वाजता पाकिस्तानवर हल्ला करेल, असं परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सांगितलं होतं”, असं सादिक यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये पाकच्या नॅशनल असेंब्लीमध्ये म्हटलं होतं.
दहशतवादी मसूद अजहरला 18 जानेवारीपर्यंत बेड्या ठोका, पाकिस्तानी न्यायालयाचे आदेशhttps://t.co/fd4upi7cH5#Pakistan | #Terrorism
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 10, 2021
Balakot Air Strike
संबंधित बातम्या :
मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला पाकिस्तानात 15 वर्षांची शिक्षा
आता पाकिस्तानी कोर्टातही ‘व्हर्जिनिटी टेस्ट’बाबत मोठा निर्णय
पाकिस्तानमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता, प्रसिद्ध ज्योतिषी सामिया खान यांची भविष्यवाणी
मुस्लीम देशांमध्ये मंदिर बांधण्यास परवानगी नाही, पाकिस्तानमधील मंदिर हल्ल्याचं झाकिर नाईकडून समर्थन