बांगलादेश चीनकडून 16 फायटर जेटची खरेदी करणार?, भारताला टेन्शन ?

पाकिस्तानची फाळणी करुन त्याचे दोन तुकडे करणाऱ्या भारताने बांगलादेशाच्या निर्मितीत मोठी भूमिका बजावली आहे. परंतू अलिकडे बांगलादेशातील सत्तापालटानंतर भारताचे आणि बांगलादेशाचे संबंध बिघडले आहेत. त्यात आता बांगलादेश चीनकडून फायटर विमाने खरेदी करणार असल्याचे वृ्त्त आहे.

बांगलादेश चीनकडून 16 फायटर जेटची खरेदी करणार?, भारताला टेन्शन ?
Follow us
| Updated on: Dec 14, 2024 | 10:04 PM

एकेकाळचा भारताचा मित्र असलेला शेजारील बांगलादेश आता माजी राष्ट्राध्यक्ष शेख हसीना यांना भारताने आश्रय दिल्याने भारताचा दुश्मन बनला आहे. या नव्या बदललेल्या परिस्थितीत बांगलादेशाच्या वायूसेनेने आता भारताचा शत्रू असलेल्या चीनकडून 16 फायटर जेटची खरेदी करण्याच्या बेतात आहे. IDRW च्या बातमीनुसार बांगलादेशच्या एअर फोर्सचे एअर चीफ मार्शल हसन महमूद खान यांनी सांगितले की आम्ही फायटर जेट आणि लढाऊ हॅलिकॉप्टर मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे भारताला आणखी एक नवा शत्रू तयार झाल्याचे म्हटले जात आहे.

बांगलादेश चीनकडून Chengdu J-10C मल्टीरोल फायटर जेट खरेदी करण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 16 J-10C लढाऊ विमाने खरेदी करण्याची बांगलादेशची योजना आहे. बांगलादेशात हिंदूवर वाढते  हल्ले आणि भारत विरोधी कारवाया सुरु असताना ही बातमी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते भारताची चीन वाढती जवळीक भारतासाठी भविष्यात मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

भारताने नाक दाबले तर…

चीन आणि पाकिस्तानचा भारताच्या नॉर्थ ईस्टमध्ये पुन्हा अशांती प्रस्थापित करण्याचा इरादा आहे. बांगलादेशातील परिस्थिती नाजूक आहे. मोठ्या प्रमाणावर हिंदूवर अत्याचार केले जात आहेत. या मागे अमेरिकेचा डिप स्टेट, चीन आणि पाकिस्तानचा देखील हात असून शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बांगलादेशाने हे समजायला हवे की चीनचे युद्धसामग्री विश्वासार्ह नाही.हिंदूस्थानशी दुश्मनी बांग्लादेशाला खूपच महागात पडू शकते. बांगलादेशाला कोणतीही समस्या आली तर भारत सर्वात आधी मदत करु शकतो. चीन आणि पाकिस्तानची सीमा त्यांच्या देशाला लागून नाही. बांग्लादेशची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात भारतावर अवलंबून आहे. बांगलादेशाच्या सर्वात मोठा टेक्सटाईल उद्योगाच्या कच्चा माल भारतातून जातो. भारत बांगलादेशाला एनर्जी, गॅस आणि तेल पुरवितो यात जर भारताने कठोर धोरण स्वीकारले तर बांग्लादेशाला ते महाग पडू शकते असे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा

चीनवर बांगलादेश नाराज राहिला

चीनचा सुरुवातीपासूनच प्रयत्न आहे की त्यांची सारी शस्रास्रे बांगलादेशाने विकत घ्यावीत. बांगलादेशातील ८० टक्के डिफेन्स उपकरणे चीनमधून आयात होतात. यात पाकिस्तानची देखील बांगलादेशावर दादागिरी आहे. चीनला तर फायदाच आहे. बांगलादेश आणि चीनच्या डिफेन्स करारात अनेक समस्या देखील आलेल्या आहेत. आधीही चीनकडून आलेल्या शस्रास्रांवर बांगलादेश नाराज राहीलेला आहे. भारतीय लष्कराचे या सर्व व्यापार आणि व्यवहारावर बारीक लक्ष आहे. भारत सर्व धोक्यासाठी सज्ज असल्याचे भारतीय परराष्ट्र धोरणातील जाणकारांनी म्हटले आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.