Ferry Crash : ‘हे पाहणं खरंच खूप कठीण..’ भल्या मोठ्या जहाजाखाली आली छोटी नौका; अर्धा डझन ठार! पाहा, थरारक Video
बांगलादेशचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका मोठ्या जहाजाखाली छोटी बोट येऊन बुडण्याचा (Ferry Crash) अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघातात किमान अर्धा डझन लोकांचा मृत्यू झाला असून 100हून अधिक जण बेपत्ता आहेत.
Bangladesh Ferry Crash : बांगलादेशचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका मोठ्या जहाजाखाली छोटी बोट येऊन बुडण्याचा (Ferry Crash) अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघातात किमान अर्धा डझन लोकांचा मृत्यू झाला असून 100हून अधिक जण बेपत्ता आहेत. हा अत्यंत धक्कादायक आणि दु:खद असा प्रकार घडला आहे. रविवारी खचाखच भरलेली बोट मालवाहू जहाजाला धडकली. राजधानी ढाकाजवळ शीतलक्षया नदीत एमव्ही रूपोशी-9 (MV Ruposhi-9) हे मालवाहू जहाज एमव्ही अफसरुद्दीनला (MV Afsaruddin) धडकल्याने हा अपघात झाला. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे, की मोठे जहाज लहान बोटीला काही मीटरपर्यंत कसे खेचते आणि नंतर बोट उलटते आणि पूर्णपणे पाण्यात बुडते. बोट बुडण्यापूर्वी काही लोक जीव वाचवण्यासाठी नदीत उडी मारतानाही दिसत आहेत.
लोकांच्या किंकाळ्या
मोठे व्यापारी जहाज थांबते पण बोट पूर्णपणे बुडाल्यावरच. हा व्हिडिओ जवळच असलेल्या दुसऱ्या जहाजात बसलेल्या लोकांनी टिपला आहे. मालवाहू जहाज बोटीला धडकल्यावर लोकांच्या किंकाळ्या ऐकू येतात. हा व्हिडिओ Redditसह अनेक सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
#NDTVBeeps | #Bangladesh Ferry Crash Video Shocks Internet pic.twitter.com/67eJpZxipl
— NDTV (@ndtv) March 21, 2022
‘हे सर्व पाहणे दु:खद’
हे Reddit वर 25,000पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. हा संपूर्ण व्हिडिओ पाहून काही यूझर्स हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या दिशेने उडी मारल्याने जीव वाचू शकतो, यावर काही यूझर्स बोलत आहेत, तर एका यूझरने रेडिटवर लिहिले आहे, की ज्यांनी बोटीच्या बाजूला उडी मारली ते जहाजाच्या इंजिनमध्ये ओढले गेले, हे सर्व पाहणे दु:खद आहे. (Video courtesy – NDTV)