डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव मान्य करण्याची वेळ आलीय, बराक ओबामांचे खडे बोल

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव स्वीकारावा, असा सल्ला दिला आहे.(Barack Obama advised to Donald Trump accept Election Result)

डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव मान्य करण्याची वेळ आलीय, बराक ओबामांचे खडे बोल
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 2:07 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव स्वीकारावा, असा सल्ला दिला आहे. डेमोक्रॅटिकचे जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी अजूनही पराभव स्वीकारलेला नाही. त्यांनी कायदेशीर लढाई सुरु ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Barack Obama advised to Donald Trump accept Election Result)

बराक ओबामा यांनी सीबीएनएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव स्वीकारला पाहिजे, असं वक्तव्य केले. “डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणी सुरु झाल्यानंतर लगेचच किंवा दोन-तीन दिवसांनतर पराभव स्वीकारला पाहिजे होता”, बराक ओबामा म्हणाले.

ओबामा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना संख्याबळाची आठवण करुन दिली.”आपण संख्याबळावर लक्ष दिलं तर बायडन यांनी सहजपणे विजय मिळवला आहे. आता निवडणुकीचे निकाल बदलण्याची कोणतीही शक्यता नाही.त्यामुळे निवडणुकीचे निकाल बदलले जाणार नाहीत”, असं बराक ओबामा म्हणाले.

बराक ओबामा यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन आणि उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांचे आताचे प्रशासन जो बायडन यांना गोपनीय माहिती आणि सामान्य सुविधा देत नाही, असा आरोप ओबामांनी केला आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प पराभव मान्य करण्यास अद्याप तयार नाहीत ट्रम्प निवणडणुकीच्या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचे ट्विटस करत आहेत. निवडणूक प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे ट्रम्प यांनी यापूर्वीच सांगितले आहे.

आजही डोनाल्ड ट्रम्प यांचा विजयाचा दावा

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Usa Presidential election) रिपब्लिक पक्षाचे उमेदवार तसंच सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आपला पराभव झाल्याचं मान्य करत नाहीत. आज नवं ट्विट करत आपण जिंकलोय, माझाच विजय झाल्याचा नारा त्यांनी दिलाय. याअगोदर आपण हरलो असल्याचं कबूल करताना जो बायडन यांच्यावर त्यांनी आरोप केले होते. मात्र आज नवं ट्विट करत आपण जिंकलो असल्याचं त्यांनी म्हटलंय.

8 डिसेंबरपर्यंत मतमोजणी

अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये 8 डिसेंबरपर्यंत मतमोजणी सुरु राहणार आहे. यावर्षी मतमोजणी प्रक्रियेला अनेक ठिकाणी मतमोजणी प्रक्रियेला कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. 538 इलेक्ट्रोल कॉलेजचे निकाल तयार केले जातील त्यानंतर ते अधिकृत रित्या अमेरिकेच्या काँग्रेसकडे सोपवले जातील.

अधिकृतपणे निकालांची घोषणा अमेरिकेच्या काँग्रेसचे अधिवेशन येत्या जानेवारी महिन्यात 6 तारखेला आयोजित केले जाईल. विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स अधिकृतपणे निवडणुकीचे निकालांची घोषणा करतील.

संबंधित बातम्या :

US Election 2020 | जो बायडन यांचा 20 जानेवारीला शपथविधी, अमेरिकेत मतमोजणी सुरुच

US Election 2020: ‘मेलानिया लवकरच डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देणार’, माजी सहकाऱ्याचा दावा

(Barack Obama advised to Donald Trump accept Election Result)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.