Corona Virus | सावधान! कुत्र्यापासून माणसापर्यंत पोहोचतोय नवा कोरोना विषाणू; अमेरिकेतील संशोधन अहवालात निष्पन्न

या अहवालात संशोधकांनी सांगितले की मलेशियामध्ये निमोनियाच्या 301 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी आठ जणांना 'कॅनिन कोरोना विषाणू'ची लागण झाल्याचे निदान झाले. (Be careful, The new corona virus is spreading from dogs to humans)

Corona Virus | सावधान! कुत्र्यापासून माणसापर्यंत पोहोचतोय नवा कोरोना विषाणू; अमेरिकेतील संशोधन अहवालात निष्पन्न
सावधान! कुत्र्यापासून माणसापर्यंत पोहोचतोय नवा कोरोना विषाणू
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 12:17 AM

न्यूयॉर्क : गेल्या वर्षी चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून पसरलेल्या कोरोना विषाणूने अख्खे जग वेठीस धरले आहे. पुढे या विषाणूची नवनवीन रुपे समोर आली असून दिवसेंदिवस जगाच्या संकटात भरच पडत चालली आहे. यातच आता कुत्र्यापासूनही माणसापर्यंत नवा कोरोना विषाणू पोहोचत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे. हे वास्तव संपूर्ण जगाची चिंता वाढवणारे आहे. न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये कुत्र्यापासून संसर्ग झालेल्या कोरोना विषाणूचे निष्पन्न झाले आहे. ‘क्लिनिकल इन्फेक्शनस डिसीज’ नावाच्या जर्नलने गुरुवारी एक संशोधन अहवाल प्रकाशित केला. या अहवालात संशोधकांनी सांगितले की मलेशियामध्ये निमोनियाच्या 301 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी आठ जणांना ‘कॅनिन कोरोना विषाणू’ची लागण झाल्याचे निदान झाले. या रूग्णांची तपासणी नोजल स्वॅब अर्थात नाकातून घेतलेल्या नमुन्यांद्वारे करण्यात आली होती. (Be careful, The new corona virus is spreading from dogs to humans)

कुत्र्यांमध्ये आढळतो कॅनिन कोरोना विषाणू

कॅनिन कोरोना विषाणू हा कुत्र्यामध्ये आढळणारा कोरोना विषाणू आहे. त्यामुळे मलेशियामध्ये ज्या रुग्णांमध्ये या विषाणूचा संसर्ग आढळला, त्यावरून कुत्र्यांच्याच माध्यमातून हा विषाणू मनुष्यापर्यंत पोहोचल्याचा संशय संशोधकांनी वर्तवला आहे. मलेशियामध्ये आढळलेले कॅनिन कोरोना विषाणूच्या रुणांमध्ये बहुतांश लहान मुले असून त्यांचे वय पाच वर्षांपेक्षा कमी आहे. रूग्णांकडून घेतलेल्या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेसिंगमधून सीसीओव्ही-हूप्न-2018 नावाच्या स्ट्रेनचा उलगडा झाला आहे. या विषाणूचे गुणधर्म हे मांजर आणि मगरीमध्ये आढळणाऱ्या कोरोना विषाणूशी मिळतेजुळते आहेत. मात्र हे गुणधर्म कॅनिन कोरोना विषाणूशी तुलनेत अधिक प्रमाणात जुळणारे आहेत. हा विषाणू कुत्र्यांमध्ये आढळतो. त्यामुळे सध्याच्या कोरोना संकटात मनुष्याने कुत्र्यांच्या किती संपर्कात राहावे, हा प्रश्न सध्या संशोधनाचा विषय बनला आहे.

अद्याप कॅनिन कोरोना विषाणूबाबत संशोधन सुरु

संशोधनात या विषाणूच्या स्ट्रेनमध्ये अशा प्रकारचे म्युटेशन आढळून आले आहे की जे मनुष्यामध्ये पसरलेल्या स्ट्रेनसारखेच आहे. सार्स-सीओव्ही आणि सार्स-सीओव्ही -2 यासारख्या स्ट्रेनशी कॅनिन कोरोना विषाणूतील म्युटेशन मिळतेजुळते आढळले आहे. दरम्यान, कॅनिन कोरोना विषाणू मनुष्याला आजारी करू शकतो की नाही, हे मात्र संशोधनात अजून स्पष्ट झालेले नाही. संशोधनात या विषाणूचा मनुष्याला धोका संभावत असल्याचे उघड झाले, तर मनुष्यासाठी धोकादायक असणारा हा आठवा कोरोना विषाणू ठरणार आहे. तसेच कुत्र्यांपासून मानवांमध्ये पसरणारा हा पहिला कोरोना विषाणू असेल.

जगभरात एकूण 7 कोरोना विषाणू

सध्या जगभरात 7 कोरोना विषाणू आहेत, जे मनुष्यामध्ये संसर्ग पसरवू शकतात. ‘सार्स-सीओव्ही-2’मुळे कोविड-19 पसरतो. बहुतांश विषाणू सर्वात आधी वटवाघळामध्ये आढळून आले होते. कधीकधी हा विषाणू वटवाघळपासून थेट मनुष्यापर्यंत पोहोचतो, तर कधी दुसऱ्या जनावरांना संक्रमित करतो व पुन्हा मनुष्यापर्यंत पोहोचतो. कॅनिन कोरोना विषाणू मनुष्यासाठी किती धोकादायक ठरू शकतो, याबाबत इतक्यात कुठलाही दावा करणे घाईचे ठरू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे. (Be careful, The new corona virus is spreading from dogs to humans)

इतर बातम्या

Mahindra वाहनधारकांसाठी खुशखबर! कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांसाठी कंपनीचा मोठा निर्णय

Puzzle Photo: या फोटोत दडलेत अनेक प्राणी, पण उंट आहे कुठे?; हुशार असाल तर शोधून दाखवाच!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.