पाकिस्तान आणि बांग्लादेशातून आलेल्या किती जणांना भारताने नागरिकत्व दिले आहे, पाहा आकडेवारी
केंद्र सरकारने लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर CAA कायदा लागू केला आहे. या कायद्यावर विरोधी पक्ष आधीपासूनच टीका करीत आहे. आता या कायद्याच्या आधी किती पाकिस्तानी आणि बांग्लादेशी नागरिकांना भारताने नागरिकत्व प्रदान केले आहे याची आकडेवारी समोर आली आहे.
मुंबई | 13 मार्च 2024 : लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर केंद्र सरकारने देशात नागरिकत्व सुधारणा कायदा ( CAA ) लागू केला आहे. या कायद्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी टीका केली आहे. या कायद्याचा सगळ्यात जास्त फटका उत्तर-पूर्वेतील लोकांना बसणार असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. बांग्लादेशातून तेथे मोठ्या प्रमाणावर लोक येतील. या देशात अडीच ते तीन कोटी अल्पसंख्यांक आहेत. CAA अनुसार साल 2014 नंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशातील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. परंतू भारत हा कायदा येण्याआधीपासून या शेजारील देशातील स्थलांतरीतांना नागरिकत्व देत आला आहे. गेल्या पाच वर्षांत येथून भारतात आलेल्या किती लोक नागरिकत्व मिळाले आणि ते कसे मिळते ते पाहूयात…
गेल्या पाच वर्षांत पाकिस्तान आणि शेजारील देशातून आलेल्या किती नागरिकांना भारताने नागरिकत्व दिले. याची माहीती आरटीआय मार्फत मागविण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांत परदेशातून आलेल्या 5,220 लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. यातील 87 टक्के लोक पाकिस्तानातून आलेले आहेत. पाच वर्षांत केवळ पाकिस्तानातून भारतात आलेल्या 4,552 लोकांना भारताने नागरिकत्व दिले आहे. या पाच वर्षांची आकडेवारी पाहाता सर्वात जादा 1,580 लोकांना 2021 मध्ये नागरिकत्व प्रदान करण्यात आले. तर सर्वात कमी साल 2018 मध्ये 450 लोकांना नागरिकत्व देण्यात आले.
last five year figure –
बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि अमेरिकेतील डाटा
पाच देशांमध्ये पाकिस्तान या देशानंतर अफगाणिस्तानच्या लोकांना भारताने सर्वाधिक नागरिकत्व दिले आहे. पाच वर्षांत अफगाणिस्तानातून आलेल्या 411 जणांना भारताने नागरिकत्व दिले आहे. त्याचवेळी बांग्लादेशातील 116, अमेरिकेतील 71 आणि श्रीलंकेतील 70 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.
गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर 2021 मध्ये सर्वाधिक परदेशी लोकांना नागरिकत्व देण्यात आल्याचे आकडेवारी सांगते. यावर्षी 1,745 विदेशी लोकांना भारतीय नागरिक मिळाले आहे. यात सर्वाधिक 1580 लोक पाकिस्तानचे होते.
भारतीय नागरिकत्व कसे दिले जाते ?
भारतात नागरिकत्व सिटीजनशिप ॲक्ट ऑफ 1955 ( सुधारित ), नागरिकत्व मिळविण्याचे चार नियम
जन्माआधारे मिळणारे नागरिकत्व :
जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 26.1.1950 ला किंवा त्यापूर्वी झाला असेल आणि त्याच्या आई-वडीलांपैकी कोणी एक भारतीय असेल तर त्याला नागरिकत्व मिळते. यात एक अट अशी आहे की या नागरिकाच्या आई-वडीलांपैकी कोणीही अनधिकृत नागरिक असायला नको.
वंशा आधारावर :
ज्या व्यक्तीचा जन्म भारताबाहेर झाला आहे, परंतू त्याची आई किंवा वडील दोन्ही पैकी एक भारतीय असेल आणि त्यांची नोंदणी परदेशात भारतीय मिशन/पोस्ट मध्ये झाला आहे. अशा नागरिक नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करु शकतात.
रजिस्ट्रेशनच्या आधार वर :
जर कोणी अनधिकृत नागरिक नाही. परंतू भारतीय वंशाचा नागरिक असेल आणि अर्जापूर्वी 7 वर्षे भारतात रहात असेल तर तो भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करु शकतो
नैसर्गिक तत्व आधारावर :
जर कोणत्याही देशाचा नागरिक आहे. परंतू तो भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर त्या देशाचे नागरिकत्व सोडण्याचे वचन देण्यास तयार असेल. किंवा गृहमंत्रालयात नागरिकत्वासाठी अर्ज सादर करण्यापूर्वी तो भारतात वास्तव्यास असला पाहिजे किंवा सलग 12 महिने भारत सरकारशी संबंधित असेल तर