नेतन्याहू यांची इस्त्राईलवरील सत्ता संपुष्टात, 6 खासदार असलेले नवे पंतप्रधान कोण? भारतासह जगावर परिणाम होणार

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची इस्राईलवरील सत्ता संपुष्टात आलीय. सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येत त्यांना सत्तेवरुन खाली खेचलंय. आता इस्राईलचे नवे पंतप्रधान 6 खासदार असलेले नेफ्टाली बेनेट हे असणार आहेत.

नेतन्याहू यांची इस्त्राईलवरील सत्ता संपुष्टात, 6 खासदार असलेले नवे पंतप्रधान कोण? भारतासह जगावर परिणाम होणार
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 8:10 PM

जेरुसलेम : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची इस्राईलवरील सत्ता संपुष्टात आलीय. सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येत त्यांना सत्तेवरुन खाली खेचलंय. आता इस्राईलचे नवे पंतप्रधान 6 खासदार असलेले नेफ्टाली बेनेट होतील अशी दाट शक्यता आहे. इस्राईलच्या 8 विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापनेवर एकमत बनवलं आहे. त्यांच्याकडून नेफ्टाली बेनेट यांना पंतप्रधान पदासाठी पुढे केलं जाणार आहे (Benjamin Netanyahu unable to prove trust vote in Israel Naftali Bennett may be next PM of Israel).

इस्राईलमध्ये मार्च 2021 मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीत नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षाला बहुमत मिळू शकलं नाही. त्यानंतर त्यांनी अल्पमताचं सरकार स्थापन केलं. निवडणुकीत नेतन्याहू यांचा पक्षा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असतानाही इस्राईलचे राष्ट्रपती रुवेन रिवलिन यांनी नेतन्याहू यांच्या पक्षाला सरकार स्थापनेचं निमंत्रण देत 2 जूनपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं. मात्र, ते अनेक प्रयत्न करुनही बहुमत सिद्ध करु शकले नाही.

नेफ्टाली बेनेट इस्राईलचे पंतप्रधान होणं जवळपास निश्चित

नेतन्याहू यांच्या पक्षाने बहुमत जमवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले, मात्र त्यांना बहुमताचा आकडा मिळवता आला नाही. दुसरीकडे इस्राईलचे विरोधी पक्षनेते येर लेपिड यांनी इस्राईलच्या विरोधी पक्षांमध्ये सरकार स्थापनेबाबत एकमत झाल्याचं जाहीर करत सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केलीय. या नव्या आघाडीत 8 पक्षांचा समावेश आहे.

विरोधीपक्षांमध्ये सत्तेच्या वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला

विरोधी पक्षांनी इस्राईलमध्ये सत्तास्थापनेची घोषणा करतानाच आपल्या सत्तेच्या वाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केलाय. यानुसार सुरुवातील यामिन पक्षाचे प्रमुख नेफ्टाली बेनेट इस्राईलचे पंतप्रधान असणार आहेत. त्यानंतर दोन वर्षे येश एटिड पक्षाचे नेता येर लेपिड स्वतः पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारतील.

कोण आहेत नेफ्ताली बेनेट?

नेफ्ताली बेनेट एक कोट्याधीश उद्योजक आहेत. तंत्रज्ञानातील व्यवसायाने त्यांनी अमाप संपत्ती जमवलीय. त्यांचे आई-वडील अमेरिकी आहे. ते अमेरिकेतून इस्राईलमध्ये येऊन स्थायिक झाले होते. तंत्रज्ञानातील व्यापारानंतर आता 49 वर्षीय बेनेट राजकारणात आलेत. नेफ्ताली बेनेट उजव्या विचारसरणीचे राजकीय नेते म्हणून परिचित आहेत. त्यांच्या भूमिकांवरुन राजकीय विश्लेषक त्यांना ‘अति-राष्ट्रवादी’ म्हणतात. बेनेटने फेब्रुवारीमध्ये म्हटलं होतं की मी नेतन्याहूपेक्षा उजवा आहे. मात्र, राजकीय फायद्यासाठी द्वेष किंवा धार्मिक धृवीकरणाचा उपयोग करत नाही.”

हेही वाचा :

वेळ आली तर अमेरिकेशीही संघर्ष करु, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंचं मोठं विधान

Israel-Hamas Ceasefire: 240 लोकांचा मृत्यू, शेकडो इमारती उद्ध्वस्त, युद्धविरामानंतर नागरिक गाझाच्या रस्त्यांवर

हमासला पुढील 24 तासात इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धविरामाची आशा, मग अमेरिकेचा UN प्रस्तावाला विरोध का? वाचा सविस्तर

व्हिडीओ पाहा :

Benjamin Netanyahu unable to prove trust vote in Israel Naftali Bennett may be next PM of Israel

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.