सुंदर चेहऱ्यांपासून सतर्क राहा….चीन सरकारने कोणाला आणि का दिले आदेश

चीनला नेहमीच पाश्चात्य संस्कृतीपासून आपल्या संस्कृतीला धोका आहे असे वाटत आले आहे. आता तर चीनच्या सरकारने आपल्या देशातील लोकांना सुंदर चेहऱ्यांपासून दूर राहण्यास सांगितले आहे.

सुंदर चेहऱ्यांपासून सतर्क राहा....चीन सरकारने कोणाला आणि का दिले आदेश
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 7:05 PM

चीनने आपल्या नागरिकांना अजब सूचना केली आहे. चीन सरकारने सुंदर चेहऱ्यांच्या लोकांपासून सावध रहायला सांगितले आहे. अशा प्रकाराची सूचना करण्यामागे चीनचा नेमका काय उद्देश आहे. चीनच्या मुख्य गुप्तहेर संस्थेने चीनच्या नागरिकांना सुंदर दिसणार्‍या स्री आणि पुरुषांपासून सावधान राहण्याचे आदेश दिले आहेत. चीनी सरकारने आपल्या विद्यार्थ्यांना सुंदर दिसणाऱ्या चेहऱ्यांच्या जाळ्यात आपण फसू नये असे म्हटले आहे. अशा लोकांना आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये असे चीनी सरकारने म्हटले आहे.

कारण काय या आदेशामागे

काही विदेशी गुप्तहेर आपल्या इमानदार चीनी नागरिकांना देशाच्या विरोधात हेरगिरी करण्यासाठी आमीष दाखवित आहेत अशी चीनच्या राज्य सुरक्षा मंत्रालयाला भीती वाटत आहे. हे गुप्तहेर अनेक विविध मार्गांचा त्यासाठी वापर करीत आहेत. हे गुप्तहेर हॅंडसम पुरुष आणि सुंदर महिलांचा मार्फत चीनी विद्यार्थ्यांशी मैत्री करीत आहेत. त्यांचा खोटे प्रेम करीत चीनी विद्यार्थ्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसविण्याचा प्रयत्न असल्याचे चीनी सरकारचे म्हणणे आहे.

गुप्तहेर हे कोणाच्याही रुपात वावरु शकतात. कधी विद्यापीठाचे विद्वान, रिसर्च करणारे संशोधक, सल्लागाराच्या रुपात देखील ते तुमच्या समोर येऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांकडे पैशाची कमतरता आहे. अशा विद्यार्थ्यांना ते फशी पाडू शकतात. असे असले तरी चीनी विद्यार्थ्यांना टार्गेट करणाऱ्या कोणत्या देशाचे नाव त्यांनी घेतलेले नाही.

चीनी विद्यार्थ्यांना चांगली पार्ट टाईमची नोकरी देण्याच्या बहाण्याने फसविण्याचा प्रयत्न गुप्तहेर करु शकतात गुप्तहेर हे काम बाजाराची माहिती जमा करण्यासाठी किंवा अभ्यासाच्या संबंधी असल्याचे सांगून आपले ईप्सित साध्य  करुन घेत आहेत. जेव्हा विद्यार्थी यात रस दाखवितात तेव्हा विदेशी हेर मोफत ट्रेनिंग आणि मदत करण्याचे आमीष दाखवितात. ते हे काम सोशल मिडिया आणि फोन वा व्हिडीओ कॉल मार्फत करीत आहेत.

पॉप कल्चर आणि रॉक म्यूझिक पासून सावधान राहा

चीनचे प्रमुख वृत्तपत्र साऊथ चाइना मॉर्निंग पोस्टने चीनमध्ये कॉलेज अभ्यासक्रमात एक नवीन पुस्तक आल्याचे म्हटले आहे.या पुस्तकात पॉप कल्चर आणि रॉक म्युझिक पासून सावधान राहण्याचा सल्ला तरुणांना या पुस्तकात दिला आहे, विदेशी ताकद या दोन्ही पाश्चात्य संस्कृतीचा वापर करुन चीनचे नुकसान करु शकतात असे त्यात म्हटले आहे.

सुंदर चेहऱ्याकडे का लवकर आकर्षित होतात लोक ?

समाजात सुंदर लोकांकडे लवकर आकर्षित होण्याची प्रवृती आहे. सुंदर लोकांना नोकरीत देखील फायदा मिळत असतो. असे केवळ काही नोकऱ्यातच होत नाही तर बहुतेक सर्वच नोकऱ्यामध्ये हे होत असते. लोक सुंदर लोकांना अधिक बुद्धीमान समजले जाते. यामुळे त्यांना अधिक संधी मिळतात. परदेशी ताकद या दोन्ही गो्ष्टींचा वापर चीनचे नुकसान करण्यासाठी करु शकतात असे या पुस्तकात म्हटले आहे.

अभ्यासात काय आढळले ?

अमेरिकेतील पेन्सिल्वेनियात एक अभ्यास झाला होता. त्यात 74 पुरुष आरोपींच्या शारीरिक सौदर्याचे मुल्यांकन करण्यात आले होते. हे मुल्यांकन त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याआधी करण्यात आले होते. जेव्हा संशोधकांनी तपास केला तेव्हा कोर्टाचा रेकॉर्ड तपासला तेव्हा त्यांना आश्चर्यकारक गोष्टी कळाल्या. जे पुरुष दिसायला स्मार्ट होते त्यांना कमी शिक्षा मिळाली होती. स्मार्ट पुरुषांना तुरुंगवासापासून वाचण्याची शक्यता अन्य पुरुषांपेक्षा दुप्पट होती.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.