बायडेन यांची नेतान्याहू यांना क्लीनचीट, गाझात 500 लोकांच्या मृत्यूमागे इस्रायलचा हात नसावा
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी बेंजामिन नेतान्याहू यांना क्लीनचीट दिली आहे. गाझात काल रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यामागे इस्रायल नसावा असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तेल अवीव | 18 ऑक्टोबर 2023 : अमेरिकन राष्ट्रपती जो बायडन यांनी इस्रायल दौऱ्यावर मोठे विधान केले आहे. गाझा हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यामागे इस्रायल असावा असे वाटत नसल्याचे जो बायडन यांनी म्हणत इस्रायलला एकप्रकारे क्लीनचीटच दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की या हल्ल्यामागे कुठली दुसरी टीम असावी. तेल अवीवला पोहचल्यानंतर जो बायडन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सोबत प्रेस कॉन्फरन्स घेतली. गाझात रुग्णालयावर झालेला हल्ला खूपच दु:खद असल्याचे जो बायडन यांनी म्हटले आहे. आतापर्यंत तरी या हल्ल्यामागे इस्रायल असावे असे वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इस्रायल आणि हमास यांचे भीषण युद्ध सुरु असताना अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन यांनी इस्रायलला भेट दिली आहे. यावेळी बायडन म्हणाले की अल अहली बॅपटिस्ट रुग्णालयावर झालेल्या बॉम्बहल्ला तुमच्या नाही दुसऱ्या टीमने केला आहे. परंतू याबाबत अजूनपर्यंत इस्रायल पंतप्रधान किंवा जो बायडन या दोघांनी कोणतेही पुरावे दिलेले नाही. गाझातील या हल्ल्यात 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
खरे तर आपला इस्रायलचा दौरा सर्वसाधारण होणार होता. इस्रायलचे लोक आणि जगातील लोकांनी पाहावे की अमेरिका कुणाच्या पाठी उभे आहे. मी व्यक्तीगत रुपाने येऊन हे स्पष्ट करु इच्छीत असल्याचे यावेळी राष्ट्रपती जो बायडन यांनी स्पष्ट केले. बायडन पुढे म्हणाले की अतिरेकी गट हमासने 1,300 हून अधिक लोकांची हत्या केली आहे. त्यात 31 अमेरिकन नागरिक आहेत. त्यांनी मुलांसह अनेकांना ओलीस ठेवले आहे. तुम्ही कल्पना करु शकता त्या मुलांवर काय प्रसंग आला असेल, याची मी कल्पनाही करु शकत नाही. त्यांनी जे अत्याचार केलेत ते पाहून इसिस त्याच्यापेक्षा अधिक तर्कसंगत वाटतेय. अमेरिका इस्रायलच्या दु:खात सामील असल्याचेही त्यांनी सांगितले.
हमास सर्व पॅलेस्टिनींचे प्रतिनिधीत्व करीत नाही
इस्रायल त्यांच्यावरील हल्ल्याला प्रत्युत्तर देत आहे. प्रत्येकाला त्याच्या स्वरक्षणाचा अधिकार असायला हवा. प्रत्येकाकडे त्याच्या संरक्षणाची तरदूत असायला हवी. हमास सर्व पॅलेस्टिनी लोकांचे प्रतिनिधीत्व करीत नाही. हमासने त्यांना केवळ दु:खच दिले आहे.