Donald Trump | खुर्ची सोडण्यापूर्वी ट्रम्प यांचा चीनला अजून एक झटका, कोणता मोठा निर्णय?
दक्षिण चीन समुद्रात चीनची वाढती आक्रमकता पाहत अमेरिकेनं गुरुवारी त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत.
नवी दिल्ली: अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे खुर्ची सोडण्यापूर्वी अनेक महत्वाचे निर्णय घेत आहेत. ट्रम्प यांच्या सरकारनं नुकतीच यमनच्या हाऊदी विद्रोहींना आंतरराष्ट्रीय दहशतावादी घोषित करण्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्याचबरोबर क्यूबा या देशाला पुन्हा एकदा दहशतवादाला थारा देणाऱ्या देशांच्या यादीत टाकलं आहे. आता कार्यकाळ संपण्यास अवघे 5 दिवस बाकी असताना ट्रम्प यांनी चीनबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची वाढती आक्रमकता पाहत अमेरिकेनं गुरुवारी त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत.(US President Donald Trump’s big decision against China)
जो बायडन यांच्यासमोरील अडचणी वाढतील
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लावलेले निर्बंधांमुळे जो बायडन यांच्यासमोरील अडचणीत वाढण्याची शक्यता आहे. जो बायडन हे अवघ्या 5 दिवसात म्हणजे 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार सांभाळणार आहेत. अशास्थितीत ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय बायडन यांच्यासाठी चीनसोबत सुरु असलेल्या कुटनितीबाबत अधिक अडचणीचे ठरु शकतील. दरम्यान, ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच चीनचे अधिकारी आणि त्यांच्या परिवाराला अमेरिकेत बंदी घातली आहे.
चीनच्या तेल कंपनीवर निर्बंध
ट्रम्प प्रशासनाने चीनची सरकारी तेल कंपनी असलेल्या चायना नॅशनल ऑफशोर ऑईल कॉर्पोरेशनवर बंदी घातली आहे. ट्रम्प यांनी चीनच्या सरकारी ऑईल कंपनीला त्या यादीत टाकले आहे, ज्या कंपनीसोबर अमेरिकेचे नागरिक कुठल्याही प्रकारचा व्यवहार करु शकत नाहीत. ‘आम्ही तोपर्यंत हे निर्बंध काय ठेवणार जोपर्यंत बीजिंग दक्षिण चीन समुद्रात आपला आक्रमक व्यवहार बंद करत नाही’, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी म्हटलंय.
ट्रम्प प्रशासनाकडून असे निर्णय का?
सत्तेपासून दूर होण्यापूर्वी ट्रम्प सरकार अनेक मोठे निर्णय घेत आहे. यामागे दोन कारणे सांगितली जात आहेत. एक म्हणजे ट्रम्प सरकार मोठ्या कार्याकाळापर्यंत आपल्या कामांची छाप सोडू इच्छित आहे. कारण, उद्या कुणी ट्रम्प यांनी कुठल्याही रणनितीविना सत्ता सांभाळली, असं म्हणू नये. तर दुसरं मुख्य कारण म्हणजे सत्तेवरुन पायउतार होताना आगामी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या अडचणींमध्ये वाढ करणं. कारण, अशाप्रकारच्या निर्णयानंतर पुढे चालून चीन आणि इराणसोबत कशाप्रकारचे संबंध प्रस्थापित करायचे हे सर्वस्वी जो बायडन यांच्या हातात आहे.
संबंधित बातम्या :
US Capitol | संसदेचं रुपांतर छावणीत, 20 हजार जवान तैनात, जवानांवर जमिनीवर झोपण्याची वेळ
US President Donald Trump’s big decision against China