ब्रह्मांडात आतापर्यंतचा सर्वात मोठा स्फोट, ताऱ्याचं रुपांतर ब्लॅक होलमध्ये, दुर्मिळ घटना कॅमेरात कैद

आता सर्वात चकित करणारी घटना घडल्याचं समोर आलंय. ब्रह्मांडात आतापर्यंतचा सर्वात मोठा स्फोट झाला आहे.

ब्रह्मांडात आतापर्यंतचा सर्वात मोठा स्फोट, ताऱ्याचं रुपांतर ब्लॅक होलमध्ये, दुर्मिळ घटना कॅमेरात कैद
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 9:10 PM

Biggest Explosion on Universe वॉशिंग्टन : ब्रह्मांडात आपली पृथ्वी आणि आकाशगंगा एकमेव नाही. अशा अनेक असंख्या आकाशगंगा अस्तित्वात आहेत. त्यामुळे ब्रह्मांडात अनेक घटना घडत असतात. याविषयी ऐकूण आपण अनेकदा अवाक होतो (Gamma-Ray Explosion). मात्र, आता सर्वात चकित करणारी घटना घडल्याचं समोर आलंय. ब्रह्मांडात आतापर्यंतचा सर्वात मोठा स्फोट झाला आहे. विशेष म्हणजे ही घटना कॅमेरात कैद झालीय. पृथ्वीपासून एक अब्ज प्रकाश वर्ष अंतरावर हा गामा-रे स्फोट झालाय. याला आतापर्यंतचा सर्वात मोठा स्फोट म्हटलं जात आहे (Biggest Explosion in the Universe Detected). हा स्फोट चमकणाऱ्या एक्स-रे आणि गामा-रेचं कॉम्बिनेशन असल्याचंही सांगितलं जातंय (Biggest Explosion of gamma ray in the Universe after death of star photo captured).

जर्मनीच्या हॅम्बर्गचे जर्मन इलेक्ट्रॉन सिंक्रोटोनचे शास्त्रज्ञांनी या स्फोटामागील कारणंही सांगितली आहेत. ते म्हणाले, “ही घटना एका ताऱ्याचा मृत्यूनंतर झाली (Biggest Explosion on Universe Near Earth). यानंतर हा मृत ताऱ्याचं रुपांतर एका ब्लॅक होलमध्ये झालं.” त्याचवेळी ही घटना कॅमेरात कैद करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं. ही घटना नामिबियाचे शास्त्रज्ञांनी हाय एनर्जी स्टीरियोस्कोपिक सिस्टम टेलीस्कोपच्या मदतीने कॅमेऱ्यात कैद केली. फोटो घेण्यासाठी अंतराळातील फर्मी आणि स्विफ्ट टेलिस्कोपचाही उपयोग झाला. हा स्फोट पृथ्वीपासून कोट्यावधी प्रकाशवर्ष अंतरावर झाला असला तरी शास्त्रज्ञांच्या मते हा आतापर्यंतचा पृथ्वीपासून सर्वात जवळचा पहिला स्फोट होता.

ताऱ्याच्या मृत्यूनंतर स्फोटाची घटना

या घटनेबाबत माहिती देताना जर्मन इलेक्ट्रॉन सिंक्रोटोनचे शास्त्रज्ञ डॉक्टर अँड्र्यू टेलर म्हणाले, “या स्फोटानंतर गामा-रे आगामी अनेक दिवस अंतराळात असेच दिसत राहतील.” याबाबत सायन्स जरनल पेपरमध्ये देखील माहिती देण्यात आलीय. याच्या लेखक शास्त्रज्ञ सिल्विया ज्हू म्हणाल्या, “संबंधित तारा वेगाने फिरत होता. यानंतर तो मृत होऊन ब्रह्मांडात मोठा स्फोट झाला. हाच स्फोट कैद करण्यात आला (Biggest Explosion Seen in Universe). स्फोटानंतरचं उत्सर्जन दोन प्रकारात विभागण्यात आलं आहे.”

अनेक दिवस आफ्टरग्लो दिसणार

पहिल्या टप्प्यात केवळ काही सेकंदच स्फोट होताना दिसतो. मात्र, दुसऱ्या टप्प्यात अनेक दिवस आफ्टरग्लो पाहायला मिळतो (Biggest Explosion on Universe History). सूर्याच्या 5 किंवा 10 पट मोठ्या ताऱ्यांचा स्फोट झाला किंवा त्यांचं रुपांतर अचानक ब्लॅक होलमध्ये झाल्यानंतरच इतका शक्तीशाली स्फोट होऊ शकतो असं मत शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. जेव्हा दोन न्यूट्रोन स्टार एकमेकांवर आदळतात आणि ब्लॅक होल तयार होतं तेव्हा ही घटना होते. अँड्रयू टेलर म्हणाले, ‘गामा रेचा स्फोट झाला तेव्हा आम्ही येथेच बसलो होतो. आता अनेक दिवस आफ्टरग्लो दिसेल.’

हेही वाचा :

पेनरोज यांच्या नोबेलमध्ये भारतीय शास्त्रज्ञाचं मोठं योगदान, अमल कुमारांच्या अनोख्या समीकरणानं ब्‍लॅक होलचं गुपित उघड

PHOTOS : NASA च्या हबल टेलिस्कोपनं ‘स्पायरल गॅलक्सींचे’ अनोखे फोटो टिपले, पाहून तुम्हीही अवाक व्हाल…

व्हिडीओ पाहा :

Biggest Explosion of gamma ray in the Universe after death of star photo captured

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.