न्यूयॉर्क: कोरोना विषाणूचा सर्वात फटका महासत्ता असलेल्या अमेरिकेला सर्वाधिक बसला आहे. अमेरिकेत 1 कोटी 60 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामुळे सर्वाधिक तीन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू अमेरिकेत झाला आहे. कोरोनावरील फायझरच्या लसीच्या वापराला अमेरिकेने परवानगी दिली आहे. मात्र, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस यांनी कोरोना संसर्गाबद्दल चिंता वाढवणारा अंदाज व्यक्त केला आहे. बिल गेटस् यांनी आगामी चार ते सहा महिन्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होणार असल्याचा इशारा दिला आहे. (Bill Gates warns for worse corona virus situation in upcoming months)
बिल गेटस यांनी सीएनएनशी बोलताना पुढील चार ते सहा महिन्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होणार असल्याचा इशारा दिला. इंस्टिट्यूट फॉर हेल्थ मैट्रिक्स अँड इव्यल्यूएशन यांसस्थेच्या अंदाजाचा बिल गेटस यांनी दाखला दिला. आयएचएमई या संस्थेने पुढील काळात कोरोनामुळे दोन लाख लोकांचा मृत्यू होण्याचा अंदाज वर्तवला आहे. बिल गेटस यांनी कोरोना संसर्गापासून वाचण्यसाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन हाच उपाय असल्याचं सांगितले. पुढील काळात अमेरिकेत संक्रमण, मृत्यू आणि रुग्णालयात दाखल होणारांची संख्या विक्रमी असेल, असं म्हटलं आहे. (Bill Gates warns for worse corona situation in upcoming months)
गेटस यांनी 2015 मध्ये एक भविष्यवाणी केली होती. बिल गेटस यांनी कोरोना विषाणू संसर्गाबाबत बोलताना हा विषाणू सध्या जितका धोकादायक आहे. त्यापेक्षा अधिक धोकादायक असेल, असं म्हटलं. आपण अजून वाईट परिस्थिती पाहिली नाही. (Bill Gates warns for worse corona virus situation in upcoming months)
अमेरिकेत फायझर लसीच्या तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर आजपासून नागरिकांना ही लस मिळण्यास सुरुवात होणार आहे. कोरोना लशीच्या पुरवठ्याचं काम पाहत असलेल्या गुस्ताव पर्ना यांनी याबाबत अधिक माहिती दिली. लशीच्या 30 लाख डोसेजची पहिली खेप या आठवड्याच्या अखेरपर्यंत सगळ्या राज्यांना पाठवण्यात येणार असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं. (Bill Gates warns for worse corona virus situation in upcoming months)
फायझर कंपनीची कोरोना व्हायरसवरची लस 95 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अमेरिकेच्या अन्न, औषध प्रशासन विभागाने ही लस सुरक्षित असल्याचं मान्य केलं आहे. खरंतर, मागील गुरुवारीच, अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) सल्लागार पॅनेलवरील फायझर-बायोनोटेकच्या सल्लागार एक्सपर्ट पॅनेलने यावर बैठक घेत हा महत्त्वाचा निर्णय दिला होका. अमेरिकामध्ये सतत वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या घटना रोखण्यासाठी लसीचा तातडीने वापराला परवानगी देण्यात आली.
अमेरिकेत आजपासून नागरिकांना मिळणार फायझर लस, पहिल्या फेरीत 30 लाख डोसhttps://t.co/kitfD5iWzL
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 14, 2020
संबंधित बातम्या:
अमेरिकेत आजपासून नागरिकांना मिळणार फायझर लस, पहिल्या फेरीत 30 लाख डोस
अमेरिकेत लसीकरणाची मोठी तयारी, मेक्सिकोचीही फायझरच्या लसीला परवानगी
(Bill Gates warns for worse corona virus situation in upcoming months)