केवळ नावापुरते राहिले होते BIMSTEC, पीएम मोदी यांनी असे केले पुनर्जीवित
बिम्सटेकची स्थापना १९९७ मध्ये झाली परंतू त्याला खरी गती २०१६ नंतर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साल २०१६ मध्ये BRICS परिषदेदरम्यान गोव्यात बिम्सटेकच्या नेत्यांची बैठक घेतली. या दरम्यान त्यांनी बिम्सटेक मजबूत करण्याचा निर्णय घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडच्या दौऱ्यावर गेले आहेत. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये BIMSTEC शिखर परिषदेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यात भारतासह सात देशांचे प्रमुख सहभाग घेत आहेत. बिम्सटेकची स्थापना १९९७ मध्ये झाली परंतू त्याला खरी गती २०१६ नंतर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साल २०१६ मध्ये BRICS परिषदेदरम्यान गोव्यात बिम्सटेकच्या नेत्यांची बैठक घेतली. या दरम्यान त्यांनी बिम्सटेक मजबूत करण्याचा निर्णय घेतला. हे पाऊल सार्कला ( SAARC ) पर्याय म्हणून बिम्सटेकला मजबूत करण्याच्या दिशेचा एक संकेत होते, खासकरुन जेव्हा भारत-पाकिस्तान तणावाने सार्क शिखर परिषद रद्द झाली होती.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, २०२२ मध्ये झालेल्या पाचव्या शिखर परिषदेत बिमस्टेक चार्टरला अंतिम रूप देण्यात आले आणि त्याला मान्यता देण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी बंगालच्या उपसागर प्रदेशात बिमस्टेकला कनेक्टिव्हिटी, समृद्धी आणि सुरक्षिततेचा पूल बनवण्याचे व्हीजन सादर केले. व्यापार, गुंतवणूक, पर्यावरण, दहशतवाद आणि हवामान बदल यासारख्या १४ क्षेत्रांमध्ये सहकार्याला चालना देण्यावर त्यांनी भर दिला.
भारताच्या नेतृत्वाखाली बिम्सटेकचा विस्तार अनेक पटीने वाढला
या आयोजनामुळे बिम्सटेकला नवीन गती आणि दिशा मिळाली आहे. यानंतर २०१९ मध्ये पीएम मोदी यांनी बिम्सटेक नेत्यांना शपथग्रहण समारंभात बोलावले होते. यामुळे या संघटनेची प्रासंगिकता आणि दृश्यता वाढली. पीएम मोदी यांच्या शेजारी प्रथम निती, एक्ट ईस्ट नितीमुळे नवीन उर्जा मिळाली. पीएम मोदी यांची महासागर दृष्टी, हिंद-प्रशांत दृष्टी यांनी बिम्सेटेकला गती मिळाली. भारताच्या नेतृत्वाखाली बिम्सटेकला गती मिळाली आणि त्याचा विस्तार झाला आहे.




Pm Modi Bimstec
पीएम मोदी यांनी 6 व्या बिम्सटेक परिषदेत भाग घेतला
भारताने बिमस्टेकला पाठिंबा आणि संसाधने पुरवली, ज्यामुळे त्याचा प्रभाव वाढला. बिम्सटेक आपला अजेंडा पुढे नेण्यासाठी भारताच्या नेतृत्वावर अवलंबून आहे. भारतासह, थायलंड, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान आणि म्यानमार हे बिमस्टेकचे सदस्य देश आहेत. या सर्व देशांचे स्वतःचे वेगवेगळे काम आहे.
BIMSTEC कोणत्या देशाचे काय काम?
भारत- सुरक्षा
बांग्लादेश- व्यापार, गुंतवणूक आणि विकास
भूटान- पर्यावरण, जलवायु
म्यानमार- कृषी आणि खाद्य सुरक्षा
नेपाल- जनसंपर्क, सांस्कृतिक संलग्नता
श्रीलंका- विज्ञान, औद्योगिक, नावीन्यपूर्णता
थाईलैंड- कनेक्टिविटी
अलिकडील बिम्सटेक संबंधित घडामोडी
फेब्रुवारी 2024 मध्ये दिल्लीत बिम्सटेक एक्वेटिक चँम्पियनशिप
ऑगस्ट 2024 मध्ये दिल्लीत बिम्सटेक बिजनेस समिट
नोव्हेंबर 2024 मध्ये कटकमध्ये बाली यात्रेत बिम्सटेक सांस्कृतिक मंडळाची भागीदारी
फेब्रुवारी2025 मध्ये सूरजकुंड मेळ्यात बिम्सटेक मंडप
फेब्रुवारी 2025 मध्ये अहमदाबादमध्ये बिम्सटेक युवा शिखर संमेलन
फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्ली में बिम्सटेक युवा नेतृत्व वाली जलवायु परिवर्तन कॉन्फ्रेस
फेब्रुवारी 2024 मध्ये बिम्सटेक-भारत समुद्री संशोधन नेटवर्क लॉन्च केले गेले