VIDEO: कराचीत दहशतवाद्यांनी स्फोट करुन उडवली पाकिस्तानी लष्कराची गाडी

बलोच लिबरेशन आर्मी (BLA) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. | Karachi blast

VIDEO: कराचीत दहशतवाद्यांनी स्फोट करुन उडवली पाकिस्तानी लष्कराची गाडी
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 10:38 AM

कराची: पाकिस्तानच्या कराची येथे सोमवारी निमलष्करी दलाची एक गाडी स्फोटाच्या (Blast) साहाय्याने उडवण्यात आली. यामध्ये एका सैनिकाचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. या स्फोटासाठी एका मोटारसायकलचा वापर करण्यात आला होता. निमलष्करी दलाची गाडी जवळ आल्यानंतर स्फोटकांनी भरलेल्या या मोटारसायकलचा रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने स्फोट करण्यात आला. (Pakistan karachi blast CCTV footage)

बलोच लिबरेशन आर्मी (BLA) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कराचीमधील वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या ओरंगी परिसरामध्ये उभ्या करण्यात आलेल्या मोटरसायकलवर हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यामुळे स्फोटात घटनास्थळी उपस्थित असणारे काही नागरिकही जखमी झाले आहेत.

स्फोटाच्या काही मिनिटं आधी मोटारसायकल घटनास्थळी आणली

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. यामध्ये स्फोटाच्या पाच मिनिटे आधी एका व्यक्तीने रस्त्यावर मोटारसायकर उभी केल्याचे दिसत आहे. हा वर्दळीचा रस्ता असल्याने निमलष्करी दलाची गाडी हळूहळू गर्दीतून वाट काढत होती. लष्कराची गाडी मोटारसायकलजवळ आल्यानंतर लगेच स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने अनेकजण गंभीर जखमी झाल्याचे समजते.

कराची स्टॉक एक्स्चेंजवर हल्ला

गेल्यावर्षी कराची स्टॉक एक्स्चेंजवरही अशाचप्रकाराच मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळी दहशतवाद्यांनी स्टॉक एक्स्चेंजच्या परिसरात अंदाधुंद गोळीबार केला होता. याशिवाय, काही ग्रेनेडसही फेकण्यात आले होते. दहशतवाद्यांनी जेव्हा अंधाधुंद गोळीबार सुरु केला तेव्हा इमारतीत जवळपास 300 कर्मचारी होते. या हल्ल्याची माहिती मिळताच कराची पोलीस आणि पाकिस्तान रेंजर्सचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर झालेल्या चकमकीत सर्व दहशतवादी ठार मारले गेले होते.

संबंधित बातम्या:

म्यानमारमधील सैन्य कारवाईने भारताची काळजी वाढली, 100 पेक्षा अधिक लोकांची घुसखोरी

धक्कादायक, अफगाणिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या पथकावर जीवघेणा हल्ला, 5 जणांचा मृत्यू

पाकिस्तानमधील वरिष्ठ सभागृहात पहिल्यादाच शिख खासदाराची एन्ट्री, कोण आहेत गुरदीप सिंह?

(Pakistan karachi blast CCTV footage)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.