चारी बाजूंनी नाकाबंदी, मृत्यूचे सावट, गाझा पट्टी का बनला पृथ्वीवरील नरक
गाझा पट्टी हा परिसर इस्रायल, इजिप्त आणि भूमध्य सागर यामधील अगदी छोटासा भाग आहे. येथे पॅलेस्टिनी राहतात. येथे प्रति किमी सुमारे साडे पाच हजार लोक रहात आहेत.
नवी दिल्ली | 12 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमास दरम्यान शनिवारपासून युद्ध छेडले गेले आहे. हमासने सर्वसामान्यांवर हल्ले सुरु केले आहेत. त्यामुळे इस्रायलच्या सैन्याने गाझा पट्टीवर चारबाजूंनी बॉम्ब वर्षाव सुरु केला आहे. त्यामुळ गाझा पट्टीतील पाणी आणि वीजपुरवठा बंद पडला आहे. गाझा पट्टीचा ताबा साल 2007 पासून हमास या पॅलेस्टिनी अतिरेकी संघटनेने घेतला आहे. हा भाग अगदी नरक बनला आहे.
गाझा पट्टी नेमकी काय ?
गाझा पट्टी हा परिसर इस्रायल, इजिप्त आणि भूमध्य सागर यामधील अगदी छोटासा भाग आहे. येथे पॅलेस्टिनी राहतात. येथे प्रति किमी सुमारे साडे पाच हजार लोक रहात आहेत. त्यामुळे या परिसरातील लोकसंख्येच्या घनतेचा अंदाज येईल. इस्रायलने प्रतिहल्ला सुरु केल्याने हा परिसराची बॉम्बच्या वर्षांवाने चाळण झाली आहे. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनूसार इस्रायलच्या हल्ल्यात साडे पाचशेहून अधिक लोक ठार झाले आहेत. तर तीन हजार लोक जखमी झाले आहेत.
साल 2021 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासचिव एंटोनिया गुटेरस यांनी या जागेला पृथ्वीवरील नरक म्हटले होते. याआधी याला ओपन एअर जेल म्हणण्यात आले. हा एक प्रकारचा खुला तुरुंगच आहे. यामागे कारणे अनेक असली तर महत्वाचे कारण गरीबी हे आहे. हे जगातील सर्वात गरीबी असलेला परिसर आहे. येथील एकूण बेरोजगारी 46 टक्के आहे. यातील युवकातील बेरोजगारी 60 टक्के आहेत. तर लागूनच असलेल्या इस्रायलमध्ये केवळ 4 टक्के बेरोजगारी आहे.
पाच पैकी एक जण उपाशी
कामाअभावी येथील लोकांना दोनवेळचे जेवण नशीबी नाही. वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. गाझापट्टीत दर पाच पैकी तीन जण कुपोषणाने आजारी आहे. येथे उपचारासाठी रुग्णालये नाहीत. पैसे नसल्याने बाहेर देखील जाता येत नाही. त्यामुळे अनेक मृत्यू अशा आजारपणामुळे होत आहेत, ज्यावर बाहेरच्या जगात उपचार उपलब्ध आहेत. साल 1967 मध्ये इस्रायलने इजिप्तशी लढून गाझावर ताबा मिळविला. त्यानंतर येथे अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न केला. परंतू पॅलेस्टिनींनी त्यास विरोध केला. इस्रायलपासून स्वतंत्र होण्यासाठी हमासने संघटना तयार केली. त्यामुळे गाझापट्टीत कायम अस्थैर्य राहीले. गाझापट्टी ही 41 किलोमीटरचा तुरुंग बनला आहे. इस्रायलने गाझापट्टीच्या चारही बाजूंनी भिंत बांधली आहे. इजिप्तनेही अमेरिकेच्या मदतीन 14 किमीची लोखंडी भिंत बनविली आहे.येथील लोक जमिन, किंवा हवाई मार्गे या देशात जाऊ शकत नाहीत.