अमेरिकेच्या लढाऊ विमान F/A-18 ने सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली, भारतीय नौदलाला काय फायदा होणार?
या जेटने स्की जंपला रँपवरुन यशस्वीपणे पूर्ण केलं. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर भारतीय एअरक्राफ्ट कॅरिअर्सच्या क्षमतेचाही अंदाज येतो
नवी दिल्ली : बोईंग आणि अमेरिकेच्या वायू दलाने नुकतंच F/A-18 सुपर हॉर्नेटची यशस्वी चाचणी पूर्ण झाली. या जेटने स्की जंपला रँपवरुन यशस्वीपणे पूर्ण केलं. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर भारतीय एअरक्राफ्ट कॅरिअर्सच्या क्षमतेचाही अंदाज येतो (Boeing F/A-18 Super Hornet Successfully Completes Ski Jump).
ही चाचणी अमेरिकेच्या मेरिलँड येथील नेव्हल एअर स्टेशन पॅट्युक्सेंट रिव्हवर झाली. या चाचणीनंतर सुपर हॉर्नेट हा भारतीय वायू दलाच्या शॉर्ट टेकऑफ बट अरेस्टेड रिकवरी सिस्टम म्हणजेच STOBAR वर योग्य ठरु शकतो, हे सिद्ध होतं.
ताकद दुप्पट होणार, बोईंगचा दावा
बाईंग डिफेंस स्पेस अँड सिक्याोरिटीच्या भारतीय फायटर्स सेल्सचे प्रमुख अंकुर कनाग्लेकर यांनी याबाबत माहिती दिली. “स्की जंपमुळे F/A-18 सुपर हॉर्नेटच्या पहिल्या आणि सुरक्षित लॉन्चमुळे भारतीय वायू सेनेच्या एअरक्राफ्ट कॅरिअर्सवर प्रभावी पद्धतीने याच्या संचलनाच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरु होते. F/A-18 Block III सुपर हॉर्नेट फक्त भारतीय वायु सेनेला उच्च स्तराची युद्ध क्षमता प्रदान करेन, इतकंच नाही तर अमेरिका आणि भारतादरम्यान नौदल उड्डयन क्षेत्रात सहकार्याच्या संधीही उपलब्ध होतील”. या जेटमुळे नौसेनाला सिंगल आणि टू-सीटरच्या माध्यमातून अनेक असे व्हेरिअंट देईल ज्यामुळे भारतीय वायू सेनेच्या क्षमतेत वाढ होईल.
भारतीय नौसेनेसाठी हे फायद्याचं ठरणार?
बोईंग कंपनी गेल्या अनेक काळापासून F/A-18 Block III सुपर हॉर्नेटला भारतीय नौदलात सामील करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कंपनीनुसार, ते कमी खरेदी किमतीवर मॉडर्न वॉर फायटर टेक्नोलॉजी उपलब्ध करुन देईल. कंपनीने तर इथपर्यंत दावा केला की प्रत्येक फ्लाईटची किंमत भारताला विकण्यायोग्य असेल कारण याचं मेन्टेनन्स सोपं असेल. F/A-18 Block III मध्ये अनेक टेक्नोलॉजीसोबतच लांब अंतरासाठी इंधन टँक, नवीन अॅडव्हान्स कॉकपिट सिस्टम, लांबपर्यंत अंतर मोजणारी इन्फ्रारेड सर्च अँड ट्रॅक डिटेक्शनसोबतच 10,000 तासांची लाईफ देण्यात आली आहे. हा जेट युएस नौदलाचा सर्वात अॅडव्हान्स जेट आहे.
ISROचे नवे उड्डाण! टीव्ही-मोबाईलच्या व्हिडीओ क्वॉलिटीवर परिणाम, जाणून घ्या नेमकं काय होणार?https://t.co/uY1HLk4bpy#ISRO #CMS01 #Satellite
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2020
Boeing F/A-18 Super Hornet Successfully Completes Ski Jump
संबंधित बातम्या :
कोरोना विषाणूचा नवा प्रकार धोकादायक, वेगाने प्रसार – बोरिस जॉन्सन
कधी अंतराळातून बर्फाने झाकलेला हिमालय पाहिलाय? नासाने काढलेला हा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल WOW!
जगातील सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान उडवणारा भारतीय वंशाचा वैमानिक रचणार नवा इतिहास