प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे ठरले, ‘या’ देशाचे पंतप्रधान राहणार उपस्थित

प्रजासत्ताक दिनाला दरवर्षी विविध देशाचे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात. Boris Johnson Republic Day 2021

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे ठरले, 'या' देशाचे पंतप्रधान राहणार उपस्थित
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 3:31 PM

नवी दिल्ली: भारतात प्रजासत्ताक दिनाला दरवर्षी विविध देशाचे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात.  2021 मधील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन उपस्थित राहणार आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारताचे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांनी दिली आहे. परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब सध्या भारत दौऱ्यावर आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. (Boris Johnson will be guest of   Republic Day 2021 )

बोरिस जॉन्सन यांची भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील उपस्थिती दोन्ही देशांमधील नव्या संबंधाचं प्रतीक आहे, असं जयशंकर म्हणाले. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांना पुढील वर्षी होणाऱ्या जी-7 समिटमध्ये उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

बोरिस जॉन्सन सहावे ब्रिटीश व्यक्ती

भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहणारे बोरिस जॉन्सन ब्रिटनचे सहावे प्रमुख व्यक्ती ठरणार आहेत. यापूर्वी 1993 मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान जॉन मेजर प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहिले होते. प्रिन्स फिलीप (1959), क्वीन इलिझाबेथ(दुसऱ्या) (1961), रॅप बटलर (1956), लॉर्ड लुईस माउँटबॅटन(1964) हे देखील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहिले होते. (Boris Johnson will be guest of   Republic Day 2021 )

बोरिस जॉन्सन पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. भारतसोबत व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात संबंध मजबूत करण्याचा जॉन्सन यांचा प्रयत्न राहिल. यूरोपीयन यूनियनमधून बाहेर पडल्यानंतर बोरिस जॉन्सन ग्लोबल ब्रिटन या ब्रँडचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी मिळाल्यामुळं आनंद झाल्याचे बोरिस जॉन्सन म्हणाले आहेत.  भारताच्या साथीनं  विविध क्षेत्रात  प्रगती करायची असल्याचंही बोरिस जॉन्सन म्हणाले. (Boris Johnson will be guest of   Republic Day 2021 )

कोरोना विषाणू संसर्गामुळे स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा देखील मर्यादित स्वरुपात साजरा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 2020 मधील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला ब्राझीलचे पंतप्रधान जैर बोल्सोनारो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

हिंदूराष्ट्र आणि राजेशाहीच्या मागणीसाठी नेपाळमध्ये आंदोलन, विरोधी पक्षांचा पंतप्रधानांवर गंभीर आरोप

बायडन आता फक्त एक पाऊल दूर !

(Boris Johnson will be guest of   Republic Day 2021 )

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.