बोरिस जॉन्सन यांनी गुपचूप लग्न उरकलं, साठीच्या उंबरठ्यावर आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात

फेब्रुवारी 2020 मध्ये बोरिस जॉन्सन आणि कॅरी सायमंडस यांचा साखरपुडा झाला होता. | Boris Johnson Carrie Symonds

बोरिस जॉन्सन यांनी गुपचूप लग्न उरकलं, साठीच्या उंबरठ्यावर आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात
बोरिस जॉन्सन आणि कॅरी सायमंडस
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 10:20 AM

लंडन: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि त्यांची वाग्दत्त वधू कॅरी सायमंडस विवाहबद्ध झाल्याची माहिती समोर येत आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा विवाहसोहळा अत्यंत गुप्तपणे पार पडला. मोजक्याच जणांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच ‘द सन’ या इंग्रजी वृत्तपत्राने बोरिस जॉन्सन (Boris Johnson) आणि कॅरी सायमंडस (Carrie Symonds) विवाहबद्ध होणार असल्याचे वृत्त दिले होते. मात्र, ते पुढील वर्षी लग्नगाठ बांधतील, असे सांगितले जात होते. परंतु, या सगळ्यांना चकवा देत बोरिस जॉन्सन यांनी गुपचूप आपले लग्न उरकून घेतले आहे. (British Prime Minister Boris Johnson marries fiancée Carrie Symonds in a secret ceremony)

56 वर्षीय बोरिस जॉन्सन पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या 33 वर्षांच्या गर्लफ्रेंडसह डाऊनिंग स्ट्रीट येथे राहत आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये बोरिस जॉन्सन आणि कॅरी सायमंडस यांचा साखरपुडा झाला होता.

गेल्याचवर्षी या दोघांना मुलगा झाला असून त्याचे नाव विल्फ्रेड लॉरी निकोलस जॉन्सन ठेवण्यात आले आहे. यापूर्वी जॉन्सन यांनी दोनवेळा लग्न केले होते. मात्र, हे दोन्ही संसार फारकाळ टिकले नव्हते. त्यानंतर आता बोरिस जॉन्सन कॅरी सायमंडस यांच्यासोबत संसाराच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत.

कोण आहे कॅरी सायमंडस?

कॅरी सायमंडस या ‘इंडिपेंडंट’ दैनिकाच्या संस्थापक मॅथ्यू सायमंडस आणि वकील जोसेफिन मॅकफी या दाम्पत्याची कन्या आहेत. 33 वर्षांच्या कॅरी यांचे बालपण लंडनमध्येच गेले आहे. त्यांनी वार्विक विद्यापीठातून कला, इतिहास आणि नाटकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. कॅरी यांनी खासदार जॅक गोल्थस्मिथ यांच्यासोबत राजकीय क्षेत्रात कामाला सुरुवात केली होती.

2010 साली हुजूर पक्षाच्या माध्यम अधिकारी म्हणून निवड झाली. या काळात बोरिस जॉन्सन लंडनच्या महापौरपदी निवडून आले. यामध्ये कॅरी सायमंडस यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर कॅरी यांनी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री जॉन व्हिटिंगडेल यांच्यासोबत काम केले. पुढील काळात कॅरी सायमंडस हुजूर पक्षाच्या जनसंपर्क विभागाच्या प्रमुख झाल्या. 2018 साली ‘Oceana’ या सागरी जीवांविषयीच्या अभ्यास प्रकल्पासाठी काम करण्यासाठी त्यांनी हे पद सोडून दिले. यानंतरच्या काळात कॅरी सायमंडस या वन्यजीव संरक्षक म्हणून नावारुपाला आल्या.

संबंधित बातम्या:

Boris Johnson India visit cancel : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय

आमच्या घरी बाळ जन्मलं, ब्रिटीश पंतप्रधानांची घोषणा, 55 वर्षांचे बोरिस जॉन्सन पाचव्यांदा बाबा

(British Prime Minister Boris Johnson marries fiancée Carrie Symonds in a secret ceremony)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.