कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो G20 परिषदेत सहभागी झाल्यामुळे कॅनडात तीव्र टीका

| Updated on: Sep 11, 2023 | 10:31 PM

कॅनडाचे पंतप्रधान रविवारी जी-20 शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर मायदेशी रवाना होणार होते, तेव्हा त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे त्यांना भारतात राहावे लागले.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो G20 परिषदेत सहभागी झाल्यामुळे कॅनडात तीव्र टीका
Follow us on

मुंबई : जस्टिन ट्रूडो यांना G20 शिखर परिषदेत नाकारले गेल्याच्या वृत्तामुळे प्रतिक्रिया येत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर भारतातील G20 परिषदेत सहभागी झाल्यामुळे कॅनडात तीव्र टीका होत आहे. दोन दिवसीय शिखर परिषदेदरम्यान जस्टिन ट्रूडो यांना जागतिक नेत्यांनी दुर्लक्ष केले होते, असे अनेक माध्यमांनी ठळकपणे सांगितले आहे. G20 शिखर परिषदेदरम्यान डिनरला ट्रूडो उपस्थित नव्हते आणि ग्लोबल बायोफ्यूल्स अलायन्सच्या लाँचलाही ते चुकले होते, असे वृत्त आहे.

कॅनडाचे मुख्य विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे यांनी X वर हा फोटो पोस्ट केला, “पक्षपातीपणा बाजूला ठेवून, कॅनडाच्या पंतप्रधानांना उर्वरित जगाकडून वारंवार अपमानित आणि पायदळी तुडवले गेलेले पाहणे कोणालाही आवडत नाही,”


कॅनडातील अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ट्रूडो यांच्यावर G20 शिखर परिषदेत वंचित राहिल्याबद्दल टीका केली.

कॅनडाला भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEC) मधून वगळण्यात आल्याबद्दल एका सोशल मीडिया युजरने ट्रूडो यांच्यावर टीका केली.

जस्टीन ट्रूडो यांना समिटमध्ये मर्यादित मीडिया कव्हरेज प्रदान करण्यात आल्याने जागतिक स्तरावर पुन्हा दुर्लक्ष केले गेले असे ही म्हटले आहे.