car travels : आता कारने बॅंकॉक गाठा, भारत-म्यानमार-थायलंड त्रिपक्षीय महामार्ग
थायलंडसारख्या निसर्गरम्य देशात कार किंवा बसने जाण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. भारत-म्यानमार आणि थायलंड यांना जोडणारा त्रिपक्षीय हायवेच्या भारतीय आणि थायलंड भागाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे.
दिल्ली : थायलंडला जायचे झाले तर आता विमानाचे तिकीट काढायची गरज नाही, तुम्ही मस्तपैकी कारने रमतगमत निसर्ग न्याहाळत त्याचा आस्वाद घेत थायलंडसारख्या निसर्गरम्य देशाला भेट देण्यासाठी लॉंग ड्राईव्हला जाऊ शकता. हो हे काही स्वप्नरंजन नाही तर खरंच आहे. थायलंडसारख्या ( Thailand ) देशाला जाण्यासाठी रस्ते मार्ग तयार केला जात आहे. भारत-म्यानमार आणि थायलंडला ( India-myanmar -Thailand Road ) जोडणारा बहुप्रतिक्षित त्रिपक्षीय महामार्ग येत्या चार वर्षांत तयार होणार आहे आहात कुठे !
भारत-म्यानमार-थायलंड त्रिपक्षीय महामार्ग हा 1360 कि.मी. लांबीचा आहे. भारत, म्यानमार आणि थायलंडचा हा संयुक्त उपक्रम आहे. कोलकाता येथे नुकत्याच झालेल्या ( BIMSTEC ) बिमस्टेक देशांच्या परिषदेत म्यानमार आणि थायलंडच्या मंत्र्यांनी या रस्ते प्रकल्पाचे काम येत्या तीन ते चार वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती दिली आहे.
प्रकल्पाची सद्यस्थिती काय
म्यानमारमधील बहुतांश महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. 2026 च्या अखेरीस उर्वरीत भाग तसेच अपग्रेडेड स्ट्रेच पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे म्यानमारचे वाणिज्य मंत्री आंग नैंग ओ यांनी सांगितले आहे. कालेवा ते यार गी दरम्यानच्या 121.8 किमी लांबीच्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत असून त्याला काही वर्षे लागणार आहेत.
आता प्रकल्पाची स्थिती काय आहे ?
म्यानमारमधील बहुतांश महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. 2026 च्या अखेरीस उर्वरीत भाग तसेच अपग्रेडेड स्ट्रेच पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे म्यानमारचे वाणिज्य मंत्री आंग नैंग ओ यांनी सांगितले आहे. कालेवा ते यार गी दरम्यानच्या 121.8 किमी लांबीच्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत असून त्याला काही वर्षे लागणार आहेत.
कोणती राज्य आणि देश कव्हर होणार ?
हा त्रिपक्षीय महामार्ग कोलकात्यापासून सुरू होतो आणि उत्तरेकडील सिलीगुडीपर्यंत जातो आणि येथून तो पूर्वेकडे वळतो. ते पुढे कूचबिहार मार्गे बंगालमधून तो बाहेर पडेल आणि श्रीरामपूर सीमेवरून आसाममध्ये प्रवेश करेल. हा मार्ग उत्तर बंगालमधील डुअर्स प्रदेशातूनही जाईल. हा मार्ग दिमापूरमधून नागालँडमध्ये प्रवेश करण्यासाठी आसामच्या पूर्वेकडील भागातून जाणार आहे. महामार्ग नंतर नागालँड आणि मणिपूरमधून दक्षिणेकडे वळतो. पुढे इम्फाळमधून पुढे जात मोरेह मार्गे म्यानमारमध्ये ( पूर्वीचा ब्रह्मदेश ) तो प्रवेश करेल. मोरेहहून माई सॉट मार्गे मंडाले, नेपिडाव, बागो आणि म्यावाड्डी असा नैऋत्य दिशेने थायलंडमध्ये प्रवेश करेल.