सासू असावी तर अशी ! डिलीव्हरीनंतर सुनेसाठी केली खास तयारी, 7 व्या मजल्यापर्यंत थेट क्रेनच..
सी-सेक्शन प्रसूतीनंतर घरी येणाऱ्या सुनेला त्रास होऊ नये, यासाठी तिच्या सासून खास सोय केली. लिफ्ट नसलेल्या इमारतीत 7व्या मजल्यावर पोहोचण्यासाठी तिने खास क्रेन भाड्याने आणली. यामुळे लोक सासूचे कौतुक करत आहेत.
सासू – सारख्या सूचनाा , सून – सूचना नकोत.. असं मजेत म्हटलं जातं. सासू- सुनेचं नातं म्हटलं की बऱ्याच लोकांच्या कपाळावर आठ्या उमटतात, त्या नात्याकडे जरा चुकूच्या नजरेनेच पाहिलं जातं. पण चीनमध्ये एका सासून तिच्या सूनेसाठी असं काही केलं जे पाहून लोक हैराणंच झाले. सुनेच्या डिलीव्हरीनंतर ती घरी येत असताना तिच्या सासूने तिच्यासाठी खास सोय केली. त्या महिलेचं घर 7 व्या मजल्यावर होतं पण लिफ्ट नव्हती. सुनेचे सिझेरियन ऑपरेशन करून डिलीव्हरी झालेली, अशा परिस्थितीत ती 7 मजले कसे चढणार असा प्रश्न पडलेल्या सासूने अनोखी शक्कल लढवली.
सुनेसाठी थेट क्रेनच आणली
हे प्रकरण चीनच्या शेनयांगमधीला आहे. जिमू न्यूजच्या वृत्तानुसार, सी-सेक्शन प्रसूतीनंतर घरी येणाऱ्या महिलेला लिफ्टशिवाय इमारतीच्या 7व्या मजल्यावर जाण्यास कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सासूने विशेष व्यवस्था केली. वांग नावाच्या सासूने आपल्या सुनेला सुरक्षितपणे वर घरी नेण्यासाठी क्रेन भाड्याने घेतली. या क्रेनच्या सहाय्याने महिलेला फ्लॅटच्या बाल्कनीत सुखरूपपणे उतरवण्यात आले. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला असून एक क्रेन कामगार वांगच्या सूनसोबत क्रेनच्या प्लॅटफॉर्मवर चढताना दिसला. मला नातू झाल्याने खूप आनंद झाला आहे. माझ्या सुनेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तिला क्रेनने घरी पोहोचवले जात आहे, असे वांगने पोस्टमध्ये लिहीले आहे. .
माझं तिच्यावर लेकीप्रमाणे प्रेम
‘मला फक्त माझ्या सुनेला आनंदी ठेवायचे आहे आणि तिला निरोगी राहण्यास मदत करायची आहे. मी तिचे जमेल तितके लाड करते, असं वांग म्हणाल्याल. तिचं लग्न माझ्या मुलाशी झालंय आणि ती आमच्या कुटुंबातील महत्वाची व्यक्ती आहे. आम्ही तिची काळजी घेतली नाही तर कोण घेणार?’ असा सवालही वांग यांनी केला.
त्यांच्या सुनेला ज्या क्रेनमधून घरी पोहोचवण्यात आलं त्या क्रेन मालकानेही प्रतिक्रिया दिली. माझ्या 15 वर्षांच्या नोकरीतील हा असा पहिलाच अनुभव होता. आमच्या क्रेनची ब्रांच 30 मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकते आणि शेकडो किलोग्रॅम वजन सहन करू शकतात, त्यामुळे असे करण्यात ( महिलेला 7 व्या मजल्यावर पोहोचवण्यात) कोणताही धोका नव्हता, असे त्यांनी नमूद केले. चीनमध्ये प्रसूतीनंतर महिलांची काळजी घेण्यासाठी खूप काही करणारी कुटुंबे अनेकदा सोशल मीडियावर ट्रेंड करत असतात.