तोंडात च्युईंगम टाकताच झाला मोठा ब्लास्ट, केवळ या चुकीमुळे विद्यार्थ्याचा बळी गेला

इस्रायलने हेजबोला अतिरेक्यांच्या पेजरमध्ये ब्लास्ट घडविल्याने जग हादरले होते. परंतू च्युईंगममध्ये कधी ब्लास्ट होऊ शकतो काय ? असा धक्कादायक प्रकार घडला आहे.

तोंडात च्युईंगम टाकताच झाला मोठा ब्लास्ट, केवळ या चुकीमुळे विद्यार्थ्याचा बळी गेला
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 7:21 PM

तुम्ही पेजरमध्ये बास्ट झाल्याचे ऐकले असेल पण च्युईंगम सारख्या गोष्टीचा ब्लास्ट होऊन कोणाचा जीव घेऊ शकतो का ? हो अशी विचित्र घटना घडली आहे. युक्रेन येथील कनोतोप शहरात असा विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. एका केमिस्ट्रीच्या विद्यार्थी व्लादीमीर लिकोनोस याचा च्युईंगम खाताना तोंडात ब्लास्ट होऊन दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. लिकोनोस एका विस्फोटक पदार्थावर रिसर्च करीत होता. तो अनेक वेळा आपल्या च्युईंगमचा स्वाद वाढविण्यासाठी सायट्रीक एसिडचा वापर करायचा. परंतू यावेळी त्याने सायट्रीक एसिड समजून एका खतरनाक विस्फोटक पावडरीचा च्युईंगममध्ये वापर केला. या छोट्या चुकीने त्याला आपला जीव गमवावा लागला.

तोंडात झालेल्या स्फोटानंतरचे भयानक दृश्य

लिकोनोस च्युईंगम चावू लागला तसे तोंडात मोठा स्फोट झाला. या धमाक्याने त्याचा चेहरा आणि जबडा संपूर्णपणे चिरला गेला. तो इतका गंभीररित्या जखमी झाला की जेव्हा मेडीकल स्टाफ आणि पोलिस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्याला वाचविण्याची कोणतीही संधी राहीली नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा चेहरा संपूर्णपणे विछीन्न झाला होता. त्यात काही वाचले नाही.स्फोट इतका भयंकर होता की आजुबाजूचे लोकही हादरले.

काय होते प्रकरण ?

लिकोनोस याने चुकुन च्युईंगममध्ये टिएनटी पेक्षाही चार पट शक्तीशाली पावडर मिक्स केली होती. परंतू घटनास्थळी सापडलेल्या 100 ग्रॅम पावडरची नेमकी माहिती अजून कळालेली नाही.परंतू बॉम्ब स्क्वॉडने या पावडरीला अत्यंत खतरनाक म्हटले आहे.

युनिव्हर्सिटीचे काय म्हणणे ?

व्लादीमीर याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्याच्या युनिव्हर्सिटीने प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी सांगितले की व्लादीमीर याने केमिस्ट्रीत ए ग्रेड आणली होती. परंतू अन्य विषयात त्याची प्रगती बेतास बात होती. त्याने कधी आपला डिप्लोमा थिसिस पूर्ण केले नाही. त्यामुळे गेल्यावर्षी त्याला कॉलेजातून काढण्यात आले.परंतू आम्ही हे स्पष्ट करु इच्छीतो की आमच्या युनिव्हर्सिटीत बॉम्ब बनविणे शिकविले जात नाही.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.