Chernobyl मध्ये वीजपुरवठा खंडित, झापोरिझ्झियामधून डेटा ट्रान्समिशन बंद; युक्रेनच्या अणु प्रकल्पातील परिस्थिती गंभीर!

4 मार्चला युक्रेनमधील Chernobyl मधील एका मोठ्या अणुउर्जा प्रकल्पावरती रशियाने हल्ला केल्यापासून तो रशियन सैनिकांच्या ताब्यात आहे.सध्या झापोरिझ्झियामधून डेटा ट्रान्समिशन होत नाही.

Chernobyl मध्ये वीजपुरवठा खंडित, झापोरिझ्झियामधून डेटा ट्रान्समिशन बंद; युक्रेनच्या अणु प्रकल्पातील परिस्थिती गंभीर!
zaporizhzhia nuclear power plantImage Credit source: google
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 3:53 PM

रशिया (russia) युक्रेनमध्ये (ukraine) युद्धाला (war) सुरूवात झाल्यापासून रशियाच्या सैनिकांनी आत्तापर्यंत युक्रेनचं मोठं नुकसान केलं आहे. त्यामध्ये अनेक सरकारी इमारती, लष्करी तळ आणि महत्त्वाची काही स्थळ बॉम्ब हल्ल्यांनी जमीनदोस्त केली आहेत. हल्ला पाहून तिथल्या अनेक लोकांनी शेजारी असलेल्या पोलंड आणि हंगेरी या देशात आश्रय घेतला आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी होते. त्यामुळे इतर देशांसह भारत देश सुध्दा अधिक चिंतेत होता. परंतु भारतातील अनेक विद्यार्थ्यांना भारत सरकारला मायदेशी आणण्यात यश आले आहे. रशियाने युक्रेनची महत्त्वाची शहर उद्वस्त केल्यानंतर त्यांनी महत्त्वाच्या अणुऊर्जा प्रकल्पावरती हल्ला केला. तिथं रशियाने ताबा मिळवल्यापासून Chernobyl मध्ये वीजपुरवठा खंडित पुर्णपणे खंडीत झाला आहे. युरोपमधला सगळ्यात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असून तिथून युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी वीज पुरवठा केला जातो.

अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतल्यापासून युक्रेनला चिंता

4 मार्चला युक्रेनमधील Chernobyl मधील एका मोठ्या अणुउर्जा प्रकल्पावरती रशियाने हल्ला केल्यापासून तो रशियन सैनिकांच्या ताब्यात आहे.सध्या झापोरिझ्झियामधून डेटा ट्रान्समिशन होत नाही. रशियाने यावरती कब्जा मिळवल्यापासून अनेकांना चिंता आहे. कारण तिथं रशियाने काही केल्यास त्याचे परिणाम युक्रेनला मोठ्या प्रमाणात भोगावे लागतील. युक्रेनच्या राष्ट्रपतींनी देखील अणुऊर्जा प्रकल्प रशियाने ताब्यात घेतल्यानंतर इतर देशांना आवाहन केले होते. त्यावेळी इतर देशांनी सुध्दा आमचं समर्थन करावं असं त्यांनी म्हणटलं होत. कारण तिथून युरोपमध्ये अनेक ठिकाणी वीज पुरवली जाते. युक्रेन अनेक नागरिकांनी भीतीच्या सावटाखाली सोडले आहे.

2 हजारांहून अधिक कर्मचारी अणु प्रकल्पात

बुधवारी, युक्रेनच्या ऊर्जा ऑपरेटर युक्रेनएर्गोने फेसबुकवर कळवले की चेरनोबिलमधील पॉवर ग्रीड पूर्णपणे डिस्कनेक्ट झाला आहे. IAEA ने याला सुरक्षेतील एक मोठी त्रुटी म्हटले आहे, तरीही त्याचा सुरक्षेवर गंभीर परिणाम झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मंगळवारी, युक्रेन एर्गोने चेरनोबिल प्लांटमध्ये रशियन सैन्याच्या देखरेखीखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दलही युक्रेनकडून चिंता व्यक्त केली. चेरनोबिलमधील कर्मचार्‍यांची परिस्थिती बिघडत आहे. 1986 सारखी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी 2 हजारांहून अधिक कर्मचारी आजही येथे कार्यरत आहेत.

Russia Ukraine war : युक्रेन-रशिया युद्धात झपाट्याने बदल, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस पोलंडमध्ये दाखल

Good News | सोशल मीडियाचा सकारात्मक वापर सांगणाऱ्या दियाला युरोपियन युनियनची शिष्यवृत्ती, औरंगाबादचा अभिमान

युद्धाच्या संघर्षझळा: युक्रेनची अन्नधान्य निर्यातीला बंदी, ताटातला घास महागणार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.