गर्लफ्रेंड, नवं संविधान आणि… 37 वर्षीय राष्ट्रपतीची का होतेय चर्चा?
युवा राष्ट्राध्यक्ष गेब्रियल बोरिक चिली आणि देशाबाहेर सातत्याने चर्चेत आहेत. त्यांचे खाजगी जीवन आणि राजकीय जीवनात त्यांनी घेतलेल्या मोठ्या निर्णयाने ते सध्या बातम्यांमध्ये आहेत. चला पाहूयात अखेर राष्ट्राध्यक्ष बोरिक एवढे चर्चेत का आले आहेत.
न्यूयॉर्क | 17 नोव्हेंबर 2023 : लॅटीन अमेरिकन देशातील सर्वात युवा राष्ट्रपती म्हणून ओळखले जाणारे चिलीचे 37 वर्षीय राष्ट्राध्यक्ष गेब्रियल बोरिक अलिकडे खूप चर्चेत आले आहेत. आपल्या प्रेयसीशी झालेला ब्रेकअपपासून ते नवीन संविधान लागू करणे आणि जनमतचाचणी करण्याच्या त्यांच्या निर्णयाने जगाचे लक्ष त्यांच्याकडे गेले आहे. काही आठवड्यापूर्वी आपले निर्णय घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बोरिक यांनी इंस्टाग्रामवरुन त्यांची प्रेयसी इरीना करमानोस हीच्याशी नाते संपल्याची घोषणा केली. मी आणि करामानोस आम्ही दोघे जण एकमेकांपासून जरी वेगळे होत असलो तरी सोबत काम करीत रहाणार आहोत असे राष्ट्राध्यक्ष बोरिक यांनी म्हटले आहे.
ग्रीक आणि जर्मन मूळ असलेली सोशल सायन्टीस करमानोस ही मार्च महिन्यात तिचा प्रियकर बोरिक राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर चर्चेत आली होती. गेल्या आठवड्यात एका चर्चासत्रात आधुनिक लोकशाहीत फर्स्ट लेडीच्या जुन्या भूमिकेसंदर्भात चर्चा केली होती. आणि यात आता बदल व्हायला हवा असे त्यांनी म्हटले. त्यांनी फर्स्ट लेडी कार्यालयाच संपविले आणि संबंधीत मंत्रालयाला सहा फाऊंडेशन चालविण्याची जबाबदारी सोपविली.
लोकशाही मजबूत करणे राष्ट्राध्यक्षांचे लक्ष्य –
आपल्या खाजगी जीवनाशिवाय राष्ट्राध्यक्ष बोरिक यांनी महत्वपूर्ण राजकीय निर्णय घेतल्याने चर्चेत आहेत. देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांचा निर्णय खास चर्चेत आहे. सामाजिक असमानता आणि राजकीय समस्यांमुळे देशभर मोठी निदर्शने झाली होती. त्यानंतर चिलीमध्ये नव्या घटनेच्या बाजूने मतदान केले. सरकारी निर्णयात नागरिकांना थेट सामील करीत राष्ट्रपती बोरिक यांनी लोकशाही प्रक्रीयेला मजबूत केल्याने सरकारी कामकाज लोकांच्या इच्छेनूसार चालावे अशा प्रयत्न त्यांनी केला आहे.
राष्ट्राध्यक्ष बोरिक यांचे महत्वाचे निर्णय –
– चिलीत चार दशकांपूर्वी सैन्याने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर घटना बदलली होती. सामाजिक असमानता आणि राजकीय तक्रारीनंतर देशभर निदर्शने झाल्यानंतर घटना बदलण्याचा निर्णय त्यांनी घेतला
– नवीन घटनेचा उद्देश्य ऐतिहासिक आणि संरचनात्मक असमानता दूर करणे, सामाजिक अधिकारांना प्रोत्साहन देणे, पर्यावरणाचे संरक्षण आणि स्वदेशी लोकांच्या अधिकारांना मान्यता देणे हा आहे.
– राष्ट्रवादी बोरिक यांनी चिलीच्या जनतेला महत्वाच्या मुद्द्यावर आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत थेट बोलण्याची परवानगी देण्यासाठी जनमत चाचणीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे देशात पुन्हा लोकशाही बहाल होऊ शकते. तसेच सरकारी कामकाज लोकांच्या मर्जीने व्हावे असा बोरिक यांचा प्रयत्न आहे.
– राष्ट्राध्यक्ष बोरिक यांचे खाजगी जीवन आणि राजकीय भूमिकेमुळे त्यांनी चिलीच्या राजकारणातील लोकप्रिय आणि प्रमुख व्यक्ती बनविले आहे. फर्स्ट लेडीची भूमिकेला नवा आकार देणे आणि नवीन घटना लागू करण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे जगाचे लक्ष्य त्यांच्याकडे गेले आहे.