ड्रॅगनचा पलटवार, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह 27 जणांवर बंदी, चीनविरोधी धोरणाचा ठपका

चीनंनं डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह एकूण 27 जणांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. (China ban Donald trump)

ड्रॅगनचा पलटवार, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह 27 जणांवर बंदी, चीनविरोधी धोरणाचा ठपका
डोनाल्ड ट्रम्प शी जिनपिंग
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 6:59 PM

बीजिंग: चीननं डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होताच त्यांच्यावर निर्बंध लागू केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातील विविध सहकारी, त्यांचे कुटुंबीय यांना चीन, हाँगकाँग, मकाऊमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या सहकाऱ्यांच्या कंपन्यांना चीन, हाँगकाँग आणि मकाऊमध्ये व्यवसाय करण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी ही माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह एकूण 27 जणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. (China banned Donald Trump and other twenty six people to enter in its land and Hongcong and Makau)

डोनाल्ड ट्रम्प आणि माईक पोम्पिओ यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी चीनच्या हिताला बाधा पोहोचवल्यामुळे निर्बंध लावण्यात आल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार पीटर के नवारो, सुरक्षा सल्लागार रॉबर्ट सी ओ ब्रान, स्टीफन के बैनन, अलेक्स एम अजार, संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत केली डी के क्राफ्ट, सहायक परराष्ट्र मंत्री डेविड आर स्टिलवेल, मॅथ्यू पोटिंगर, जॉन बोल्टन यांच्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. जो बायडन यांच्या शपथग्रहण कार्यक्रमानंतर हे निर्बंध जाहीर करण्यात आले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात चीन-अमेरिका संबंधात तणाव

डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदावर असताना चीनसोबतचे संबंध बिघडले होते. व्यापार, मानवाधिकार, कोरोना विषाणू, चिनी अ‌ॅप, वादग्रस्त दक्षिण चीन समुद्र अशा मुद्यांवरुन दोन्ही देशातील संबंध बिघडले होते. चीनचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी ट्रम्प यांच्या प्रशासनानं चीनची प्रतिमा बिघडवल्याचा आरोप केला. चीनविषयक द्वेष पसरवण्याचं काम करण्यात आले. अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती माईक पोम्पिओ यांनी चीनविषयी अनेक खोटे आरोप केले होते, असाही आरोप हुआ चुनयिंग यांनी केला.

संबंधित बातम्या: 

Donald Trump Farewell : अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडलं, शेवटच्या भाषणात भावूक, म्हणाले…

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन आता ‘एवढा’ पगार घेणार

(China banned Donald Trump and other twenty six people to enter in its land and Hongcong and Makau)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.