चीनमध्ये कोरोनाचा कहर, अंत्यसंस्कारासाठी मृतदेह प्रतिक्षेत, तब्बल 10 किलोमीटरची रांग…
चीनमध्ये मागच्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह प्रतिक्षेत आहेत....
बीजिंग : चीनसह अन्य देशातही कोरोनाचे रुग्ण (China Coronavirus) वाढत आहेत. त्यामुळे जगभर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची (Corona) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चीनमधील परिस्थिती इतकी गंभीर आहे की मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत आहेत. त्यासाठी तब्बल 10 किलोमीटरची रांग लागली असल्याचा एक व्हीडिओ समोर आला आहे.
नव्या कोरोना व्हेरिएंटने चीनमध्ये हाहा:कार माजवलाय अशात. त्यामुळे कोरोनामुळे लोकांना जीव गमावावा लागत आहे. एवढ्या लोकांचे प्राण कोरोनामुळे जात आहेत. की स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कारासाठी रांग लागत आहे.अंत्यविधीसाठी 10 किलोमीटर लांब रांग लागल्याचीही माहिती आहे. आपल्या आप्त स्वकियांच्या अंत्यसंस्कारसाठी रांगेत आहेत. आपला नंबर येण्याची वाट पाहात आहेत.
चीनसोबतच जपान, तैवानसह अन्य देशांमध्येही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातलाय.
भारतात कोरोनाचा शिरकाव
परदेशातून भारतात आलेल्या 4 प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे.बाहेरून बिहारमध्ये आलेल्या चार प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाल्याची माहिती आहे. याापैकी तीन जण हे म्यानमारचे रहिवासी आहेत. तर एकजण बँकाँकमधील आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या चौघांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. याबाबत बिहार सरकारने माहिती दिली आहे.
परदेशातून बिहारमध्ये आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे.शिवाय या रुग्णांना कोरोनाच्या नव्या व्हेरिएटचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
परदेशातून बिहारमध्ये आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे.शिवाय या रुग्णांना कोरोनाच्या नव्या व्हेरिएटचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात हा व्हेरिएंट पहिल्यांदा आढळल्याने भितीचं वातावरण आहे. आता कोरोनाच्या या व्हेरिएंटला पसरू न देणं हे सरकारसमोरचं मोठं आव्हान आहे.